साेमैयांचे मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान; नाईकांनी विचारला जाब

साेमैयांचे मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान; नाईकांनी विचारला जाब
kirit somaiya vaibhav naik

सिंधूदूर्ग : किरीट सोमैया यांनी आज (शुक्रवार) त्यांच्या कणकवली दाै-यात महाविकास आघाडीमधील मंत्री अनिल परब यांच्यावर पुन्हा एक गंभीर आरोप करुन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना वाचवून दाखवावे असे खूले आव्हान दिले आहे. kirit-somaiya-addressed-media-in-kankavali-anil-parab-vaibhav-naik-nitesh-rane-sml80

साेमैय्या यांनी त्यांच्या नियाेजीत बैठकानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले अनिल परब anil parab यांनी अजून एक रिसॉर्ट लपून ठेवले आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांना मी ओपन चॅलेंज देताे की तुम्ही अनिल परब यांना वाचवून दाखवाच असे म्हटले आहे.

kirit somaiya vaibhav naik
काेकणवासीयांनाे! बाप्पाच्या उत्सवास गावी जाणार आहात? हे वाचा

दरम्यान वैभव नाईक यांनी ही लगेच पत्रकारांशी संवाद साधत सोमैया हे बेजबाबदार वक्तव्ये करीत आहेत. खासदारकी पासून शिवसेनेने वंचित ठेवल्यामुळे किरीट सोमैया शिवसेनेवर टीका करीत आहेत. अनिल परब यांच्या मागे शिवसेना खंबीर पाठीशी आहे. अनिल परब यांना आम्ही चांगलं ओळखतो. राणेंवरील आरोपाचे काय झाले याचे उत्तर सोमैया यांनी द्यावे असे नाईक यांनी नमूद केले.

दरम्यान मुख्यमंत्र्यांवर सातत्याने केली जाणारी टीका आम्ही सहन करणार नाही. जर मुख्यमंत्र्यांवर टीका हाेत राहिली तर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील. जन आशीर्वाद यात्रेत टीका झाल्यानंतर त्याच पुढे काय झाले हे सर्वांना माहित असल्याचा टाेला नाईकांनी लगावला.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com