"उद्धव ठाकरे यांचं सरकार उद्धट सरकार; मंत्री पैसे मोजण्यात व्यस्त"

भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) साईदर्शनासाठी साई दरबारी आले आहेत.
"उद्धव ठाकरे यांचं सरकार उद्धट सरकार; मंत्री पैसे मोजण्यात व्यस्त"
"उद्धव ठाकरे यांचं सरकार उद्धट सरकार; मंत्री पैसे मोजण्यात व्यस्त"Saam Tv

गोविंद साळुंके

शिर्डी : भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) साईदर्शनासाठी साई दरबारी आले आहेत. यावेळी त्यांनी साई समाधीचे दर्शन घेतले आहे. तसेच भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्रासाठी सोमय्या यांनी संकल्प केला आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

हे देखील पहा-

ठाकरे सरकारवर घणाघाती टीका;

यावेळी बोलत असताना सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे यांचं सरकार उद्धट सरकार आहे. एक एक मंत्र्यांचे कारनामे बघा, एक १०० कोटींच्या वलुसीप्रकरणी जेल मध्ये आहे. दुसरा कार्यकर्त्यांना किडनॅप करतो म्हणून बेल वर आहे. तिसरा बँकेत ९८० कोटींचा घोटाळा झाला म्हणून आनंद अडसूळ गेले साडे तीन महिने दवाखाण्यात बसून आहेत आहे. तर एक बेकायदेशीर 5 स्टार रिसॉर्ट बांधण्यात व्यस्त आहेत असा टोला त्यांनी अनिल परब (Anil Parab) यांना यावेळी लगावला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांची आलिबाबा चाळीस चोरांची टीम आहे. त्यांनी चोरी केलेल्या मालाचा हिशोब कोणी घेण्यासाठी घरी येणार का याची भीती वाटत असेल आणि ते स्वाभाविक आहे.

यावेळी बोलत असताना, नवाब मलिकांच्या (Nawab Malik) ट्वीटवर सोमय्यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले, ज्यांनी चोरी केली आहे, लबाडी केली आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे.

"उद्धव ठाकरे यांचं सरकार उद्धट सरकार; मंत्री पैसे मोजण्यात व्यस्त"
Breaking: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीचे समन्स ! "या" प्रकरणी नाव समोर

आज शिर्डीत येवुन साईबाबांचा आशीर्वाद घेतल्याने माझ्या कामाला अजून गती मिळणार. नगर जिल्ह्यातील तनपुरे यांनी राम गणेश गडकरी साखर कारखाना शरद पवारांच्या (Sharad Pawar) मार्गदर्शनाखाली बेनामी पद्धतीने घेतला. कारखान्याची जमीन अनिल देशमुखांना हस्तांतरित केली. हे काय गौडबंगाल आहे याची चौकशी सुरू आहे. शरद पवारांच्या आशीर्वादाने लाखो शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हडप केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com