सेनेने ताे व्हिडिओ लावून राणे समर्थकांना बालेकिल्यातच डिवचले

सेनेने ताे व्हिडिओ लावून राणे समर्थकांना बालेकिल्यातच डिवचले
shivsena bjp

सिंधुदुर्ग : भाजप नेते किरीट सोमैया हे आज (शुक्रवार) कणकवली दाै-यावर आहे. कणकवली येथील शिवसेना shivsena शाखेसमोर किरीट सोमैया Kirit Somaiya तुम्ही बोललात याचे काय झाले आज सांगाल का? सिंधुदुर्ग आपली वाट बघतोय अशा आशयाचा फलकासह साेमैया यांना आठवण करुन देणारा एक व्हिडिआे लावण्यात आला आहे.

साेमैया यांच्या स्वागतासाठी शिवसेना शाखे समोरील रस्त्यावर भाजपचे bjp कार्यकर्ते माेठ्या संख्येने जमले हाेते. शिवसेना शाखेत देखील आमदार वैभव नाईक vaibhav naik यांच्यासह माेठ्या संख्येने शिवसैनिक जमले हाेते. या पार्श्वभुमीवर भाजप आणि शिवसेना shivsena bjp कार्यकर्त्यांत संघर्ष हाेऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

shivsena bjp
चूरशीच्या लढतीत प्रवीण कुमाराची अव्वल कामगिरी; भारतास ११ वे पदक

सोमैया यांनी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहाेत. तसेच संचयनीच्या गुंतवणुकदारांशी चर्चा करुन त्यांच्यासमवेत एक बैठक घेणार असल्याचे आज (शुक्रवारी) सकाळी स्पष्ट केले आहे. दरम्यान शिवसेनेने राणेंच्या बालेकिल्ल्यात साेमैय्या यांनी नारायण राणेंच्यावर narayan rane ईडीच्या enforcement directorate कारवाईची मागणी करणारा पुर्वीचा व्हिडिआे चाैकात लावून भाजप कार्यकर्ते आणि राणे समर्थकांना डिवचले आहे. दरम्यान आज हाेणा-या पत्रकार परिषदेत साेमैय्या काय बाेलणार याचे लक्ष काेकणवासीयांना लागून राहिले आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com