किरीट सोमय्यांचे आरोप धादांत खोटे; जयंत पाटलांचा सोमय्यांवर पलटवार

किरीट सोमय्यांनी आमच्या नेत्यांना बदनाम करण्याच काम सुरू केलं आहे.
किरीट सोमय्यांचे आरोप धादांत खोटे; जयंत पाटलांचा सोमय्यांवर पलटवार
किरीट सोमय्यांचे आरोप धादांत खोटे; जयंत पाटलांचा सोमय्यांवर पलटवारSaamTV

सांगली : एखाद्या राजकीय नेत्यांवर धादांत खोटे आरोप करणे मंत्र्यांना टार्गेट करणे अतिशय चुकीची पद्धत आहे मात्र किरीट सोमय्या (Kirit Somaiya) ते जाणीवपूर्वक करत असतात त्यांनी आमच्या नेत्यांना बदनाम करण्याच कामच सुरू केलं आहे. हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) साहेब या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह (involve) असतील असं मला वाटत नाही. असे वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे. ते सांगली येथील इस्लामपुर मध्ये बोलत होते. (Kirit Somaiya's allegations are false- jayant patil)

हे देखील पहा-

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या परिवाराने सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातच 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता यावरच मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

कोणीही आरोप केले तर त्याची चौकशी होतेच, चौकशी अडवू नये सांगली मध्यवर्ती बँकेत चौकशीत काही निष्पन्न होईल असे मला वाटत नाही. जनसामान्य माणसात हसन मुश्रीफ यांची प्रतिमा चांगली आहे असही ते म्हणाले. पुणे विभागाचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सांगली जिल्हा बँकेचे चौकशी चे आदेश दिले आहेत शिराळ्याच्या आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik) यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीने दिलेल्या तक्रारी च्या आधारे ही कारवाई होत आहे अशी माहिती देखील जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

किरीट सोमय्यांचे आरोप धादांत खोटे; जयंत पाटलांचा सोमय्यांवर पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष; प्रविण दरेकरांचा गंभीर आरोप (पहा व्हिडीओ)

सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार

किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे खोटे असून सोमय्यांवर आपण १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com