किरीट सोमय्यांचा बंजरंग खारमाटेंच्या बंगल्यासमोर सेल्फी; केले गंभीर आरोप
किरीट सोमय्यांचा बंजरंग खारमाटेंच्या बंगल्यासमोर सेल्फी; केले गंभीर आरोपtwitter/@KiritSomaiya

किरीट सोमय्यांचा बंजरंग खारमाटेंच्या बंगल्यासमोर सेल्फी; केले गंभीर आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बजरंग खारमाटे यांच्याकडे एकुण ६५० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा गंभीर आरोप केला होता.

सांगली: शिवसेने नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Amil parab) यांच्या अडचणीत आळखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचे निकटवर्तीय मानले जाणारे परिवहन अधिकारी बजरंग खारमाटे (Bajrang Kharmate) यांना ईडीने (Enforcement Directorate) मनी लॉंड्रींग (money laundering) प्रकरणात नोटीस पाठवली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiyya) यांनी बजरंग खारमाटे यांच्याकडे एकुण ६५० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यासाठी सोमय्यांनी थेट बजरंग खारमाटेंच्या बंगल्यासमोर जाऊन सेल्फी (Selfie) घेत गंभीर आरोप केले आहेत. (Kirit Somaiya's selfie in front of Banjarang Kharmate's bungalow; Serious allegations made)

हे देखील पहा -

आपल्या ट्विटमध्ये किरीच सोमय्या म्हणाले की, ''तासगाव सांगली, येथील बजरंग खरमाटे यांच्या फार्म हाऊसची पाहणी केली. खरमाटे चा आणखी ४ बेनामी मिळकत सांगली येथे आहे. अनिल परबचे सहाय्यक खरमाटे यांच्याकडे सांगली, पुणे, बारामती, मुंबई येथे 40 हून अधिक अधिकृत/बेनामी मिळकत (properties) आहेत.'' असे गंभीर आरोप त्यांनी खारमाटेंवर केले आहेत.

किरीट सोमय्यांचा बंजरंग खारमाटेंच्या बंगल्यासमोर सेल्फी; केले गंभीर आरोप
जाईल तिथं राजकारणाची खोड असलेले 'पोस्टर बॉय' इथेही खोडा घालतायेत- गोपीचंद पडळकर

३० ऑगस्टला बजरंग खारमाटे यांच्या नागपुरातील घरावर ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर त्यांना समन्स बजावण्यात आले होते. त्याअगोदर दोन आठवड्यांपुर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांना सक्त वसूली संचालनालयाने समन्स बजावले होते. प्रादेशिक परिवहन विभागात कार्यरत असलेले अधिकारी बजरंग खारमोटे हे अनिल परब यांचे विश्वस्त मानले जातात, त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com