Breaking : मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक? किरीट सोमय्यांचं ट्विट!

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाल्याचे ट्विट भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले आहे.
Breaking : मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक? किरीट सोमय्यांचं ट्विट!
- जितेंद्र आव्हाड-किरिट सोमय्या- Saam Tv

मुंबई : फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यावर अनंत करमुसे या सिव्हिल इंजिनिअर तरुणाला एप्रिल २०२० मध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी त्यावेळी आव्हाडांच्या तीन बॉडीगार्डवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. हे तिघेही पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी होते. यातील दोघे जण मुंबई पोलीस दलातील तर एक जण ठाण्यातील पोलीस कर्मचारी होता आहे. या प्रकरणात एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली होती.

याच प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना कधी अटक होणार? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक वेळा उपस्थित केला होता. अनंत करमुसे प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारला गेल्या वर्षी भाजपने चांगलेच धारेवर धरले होते.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यानंतर सिव्हिल इंजिनिअर असलेल्या अनंत करमुसे यांना आव्हाड यांच्या बंगल्यावर १५ ते २० जणांनी अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. या प्रकरणानंतर राज्यातील भाजपा महाविकास आघाडी सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली होती.

अनंत करमुसे प्रकरणात ठाकरे सरकारने सहा महिन्यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये आव्हाड यांच्या तीन अंगरक्षकांना अटक केली होती. त्यानंतर आता ऑक्टोबर २०२१ मध्ये जितेंद्र आव्हाडांना अटक झाल्याचे ट्विट किरीट सोमय्यांनी केले आहे.

दरम्यान, नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आव्हाड यांना अटक होऊन जामीन देखील मंजूर झाला आहे. कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com