एनएच 4 : वाहतूक पुन्हा महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे

kognali
kognali

काेल्हापूर : बुधवारी रात्री पासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र, काेकणसह कर्नाटक राज्याला फटका बसला आहे. बुहतांश ठिकाणाचे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुक ठप्प झाली आहे. (kognali-national-highway-transportation-maharashtra-rain-updates)

वाहतुकदारांनी पाण्याचा अंदाज घेऊनच मार्गक्रमण करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कर्नाटक महाराष्ट्र सीमावर असणाऱ्या कर्नाटकातील यमगरणी जवळील वेदगंगा नदीचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्याने या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे. दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली असल्याने या ठिकाणीही राष्ट्रीय महामार्गावर पाणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

kognali
वाईजवळ दरड कोसळली; २ जणांना बाहेर काढले

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी kognali फाट्यावरून वाहतूक परत महाराष्ट्रात पाठविण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com