लाटांच्या तडाख्यात १५ मच्छीमाऱ्यांनी अनुभवला जीवघेणा प्रवास

लाटांच्या तडाख्यात १५ मच्छीमाऱ्यांनी अनुभवला जीवघेणा प्रवास
प्रातिनिधिक छायाचित्र

सिंधुदुर्ग : गेल्या दाेन दिवसांपासून काेकणातील बहुतांश भागात पावसाचा फटका नागरिकांना बसला आहे. त्यातच वातावरण बदलामुळे समुद्र देखील खवळत असून त्याचा फटका तारकर्ली येथील समुद्र किनाऱ्यावर असणा-या कुबल रापण संघाच्या मच्छीमाऱ्यांना बसला. सुमारे १५ मच्छीमार हे अथक परिश्रमानंतर बचावले आहेत. kokan-news-15-fisherman-saved-tarkarli-sea-narayanprasad-boat-sml80

हे सर्व मच्छीमार नारायणप्रसाद या नौकेवर मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेले हाेते. परंतु त्यांना खवळलेल्या समुद्राच्या लाटांच्या अंदाज आला नाही. त्यांची नाैका लाटांच्या तडाख्यात सापडली. त्यांनी खूप प्रयत्न केले परंतु लाटांच्या तडाख्यात सापडलेली नाैका त्यांना लवकर किनारी आणता आली नाही.

प्रातिनिधिक छायाचित्र
काळजी घ्या! बाप्पाच्या उत्सवानंतर ७ जिल्ह्यात काेविडचे विघ्न

नाैका बुडाल्यानंतर त्यांचा जीवघेणा संघर्ष सुरु झाला. या संघर्षातून मच्छीमार बचावले. दरम्यान याबाबत कुणाल बापार्डेकर म्हणाले नाैकेची साधारणतः दीड लाखांचे नुकसान झाले आहे. आता पुढचे काही दिवस आम्हांला नाैकेच्या दुरुस्ती निधी जमावा लागेल. परंतु दैव बलवत्तर म्हणून आम्ही सर्वजण वाचलाे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com