Kolhapur News: 'लोका सांगे ब्रह्मज्ञान...' सोशल मीडियावर झाडले तत्वज्ञान अन् स्वतःच लाच घेताना सापडला; सहाय्यक फौजदाराचा कारनामा

Kolhapur News Update: या कारवाईनंतर सोमनाथ चाळचूक यांचीच सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल होत आहे.
Kolhapur News
Kolhapur NewsSaamtv

रणजित माजगावकर, प्रतिनिधी...

Kolhapur News: ८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमवतो, पण कुठलाच जीव उपाशी रहात नाही आणि माणूस पैसे कमवूनही त्याचे कधीच पोट भरत नाही? अशी पोस्ट करत लाच न घेण्याचा सल्ला देणारा पोलिस अधिकारी स्वतःच लाच घेताना सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत असून दुसऱ्या सांगे तत्वज्ञान, स्वतः कोरडे पाषाण अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमनाथ देवराम चाळचूक या सहाय्यक फौजदाराला १५ हजारांची लाच घेतलाना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथं वाहन परत देण्यासाठी दहा हजाराची लाच घेताना लाचमुख विभागाने ही कारवाई केली. सोमनाथ देवराम चाळचूक हे जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार म्हणून काम पाहत होते. या कारवाईनंतर सोमनाथ चाळचूक यांचीच सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल होत आहे.

Kolhapur News
Naygoan Bajar Samiti Election News : नायगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविराेध; भाजप, काँग्रेसच्या दिलजमाईची चर्चा

लोका सांगे ब्रम्हज्ञान...

दरम्यान, सोमनाथ चाळचूक यांनी सोशल मीडियावर (Social Media) केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत होती. ही पोस्ट सोमनाथ चाळचूक यांनी २८ डिसेंबर २०२२ ला केली होती. या कारवाईनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या असून लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण... अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. (Kolhapur News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com