Dream 11 winner : वडिलांचं 'ड्रीम' मुलाने पूर्ण केलं; कोल्हापूरचा सक्षम ठरला 1 कोटी रुपयांचा मानकरी

सातवीत शिकणाऱ्या मुलाने ड्रीम ११ या प्लेइंग अॅपवर क्रिकेट गेम खेळून एक कोटींची रक्कम जिंकली आहे.
Dream 11 winner
Dream 11 winnerSaam tv

रणजीत माजगांवकर

kolhapur News : कोणाचं नशीब कधी कसं पलटेल हे कोणीही सांगू शकत नाही. नशीबाची साथ लाभली तर एखादा गरीब रातोरात श्रीमंत होऊ शकतो. याचप्रकारे कोल्हापुरातील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं पालटलं आहे.

सातवीत शिकणारा विद्यार्थी एकाच रात्रीत तो कोट्याधीश झाला आहे. सातवीत शिकणाऱ्या मुलाने ड्रीम ११ या प्लेइंग अॅपवर क्रिकेट गेम खेळून एक कोटीची रक्कम जिंकली आहे. (Latest Marathi News)

Dream 11 winner
President's Police Medal : अभिमानास्पद! देशभरातील ९०१ पोलिसांना पदके जाहीर; राज्यात 'या' पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील मुरगूडच्या सक्षम बाजीराव कुंभार या इयत्ता ७ वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने 'ड्रीम इलेव्हन' या ऑनलाईन खेळात कोट्याधीश होण्याचा बहुमान मिळवला आहे. काल रात्री त्याच्या वडिलांच्या अकाउंटवर जिंकलेली रक्कम जमा झाल्यानंतर गावात एकच जल्लोष करण्यात आला. त्याचे वडील बाजीराव कुंभार हे महावितरण मध्ये कर्मचारी आहेत.

सक्षम बाजीराव कुंभार हा 'ड्रीम इलेव्हन' अॅपवर एक कोटी जिंकल्यानंतर त्याच्या कुटुंबाने एकच जल्लोष केला. शिष्यवृत्ती परिक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या सक्षमला क्रिकेटबद्दल चांगलीच माहिती आहे.

रात्री साडे नऊ वाजता त्याने ऑनलाईन एक कोटीची रक्कम जिंकल्यानंतर सर्वांनाच सुखद धक्का बसला. उत्साही युवक आणि नातेवाईकांनी शहरातून मोटरसायकल रॅली काढून आनंद साजरा केला.

Dream 11 winner
Jayant Patil : राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्यांवरून जयंत पाटलांची शिंदे सरकारवर टीका; म्हणाले,एकही मायचा लाल...

ड्रीम इलेव्हन काय आहे ?

'ड्रीम इलेव्हन ' क्रिकेटचं (Cricket) ऑनलाईन अॅप आहे. या अॅपमध्ये क्रिकेटच्या ज्ञानाचा उपयोग करून टीम बनवू शकता. यामध्ये तुम्ही ज्या खेळत आहेत. त्यातील उत्कृष्ट खेळाडू निवडावे लागतात. तुम्ही निवडलेले खेळाडू चांगलं प्रदर्शन करत असेल, तर तो डाव जिंकता. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असलेली पहिलं बक्षिस मिळते.

Disclaimer : ड्रीम इलेव्हन हा जोखमीचा खेळ आहे. त्यामुळे ऑनलाईन 'ड्रीम इलेव्हन' तुमच्या जोखमीवर खेळा. आम्ही सकारात्मक परिणामाची हमी दिली नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com