Kolhapur Crime News: कोल्हापूर हादरले! डॉक्टरकडे जातो म्हणून बाहेर पडला अन्; तरुणासोबत घडलं भयंकर

Kolhapur News Update: सकाळी फिरायला जाणाऱ्या व्यक्तींना तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली....
Kolhapur Crime
Kolhapur CrimeSaamtv

रणजित माजगावकर, कोल्हापूर...

Kolhapur News: कोल्हापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील उचगावात एका तरुणाची निर्घृण हत्येची घटना उघडकीस आली आहे. गणेश नामदेव संकपाळ असं खून झालेल्या तरुणाच नाव असून या भयंकर हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

Kolhapur Crime
Dhule News: सॅनिटरी पॅडचा आडून विदेशी दारूची अवैध वाहतूक; पोलिसांनी मुद्देमाल केला जप्‍त

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील (Kolhapur) उचगावातील तरुण गणेश नामदेव संकपाळ हे बुधवारी रात्री डॉक्टरांकडे जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र रात्रभर तो घरी परतलाच नाही, ज्यामुळे कुटंबियही चिंतेत पडले होते. मात्र सकाळी फिरायला जाणाऱ्या व्यक्तींना गणेश संकपाळ याचा रक्ताच्या थारोळ्यात माखलेला मृतदेह दिसला.

Kolhapur Crime
Gautam Adani Meets Sharad Pawar: मोठी बातमी! गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

या घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या भयंकर घटनेचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. तरुणासोबत हे भयंकर कृत्य कोणी केले असेल, या हत्येमागचे नेमके कारण काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान पोलिसांंसमोर आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com