
- रणजीत माजगावकर
Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ संघाचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील (gokul chairman vishwas patil resigns) यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. पाटील यांचा राजीनामा संचालक मंडळाने नुकत्याच झालेल्या एका बैठकीत मंजूर केला आहे. येत्या 25 मे रोजी गाेकुळच्या नूतन अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. (Maharashtra News)
गाेकुळच्या नूतन अध्यक्षांच्या निवडीसाठी पुणे (pune) विभागाचे विभागीय उपनिबंधक डॉक्टर महेश कदम हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान नेत्यांनी ठरवलेल्या फॉर्मुल्यानुसार गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे (arun dongale) यांची नूतन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. विश्वास पाटील यांनी नेत्यांना दिलेल्या शब्दानुसार त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विश्वास पाटील यांच्याबाबत काेल्हापूरात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. गोकुळचं चाचणी लेखापरीक्षण सुरू असताना हा राजीनामा दिला गेला असा या चर्चेचा सूर राहिला आहे.
दरम्यान गोकुळचे लेखापरीक्षण हे राजकीय हेतून केलं जात असून यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं विश्वास पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले. त्यामुळे या उलट सुलट चर्चेला फार महत्व दिलं जाऊ नये असेही पाटील यांनी नमूद केले.
ते म्हणाले गेल्या दोन वर्षाच्या काळात जिल्हा उत्पादक दूध संघाची 2550 कोटी वरून 3420 कोटी रुपयांवर उलाढाल झाली. सुमारे 870 कोटी रुपयांची वाढीव उलाढाल झाल्याचं पाटील यांनी स्पष्ट केले. तसंच दोन वर्षाच्या कालावधीत दूध उत्पादकांना दूध खरेदीसाठी सात वेळा दूध खरेदी दरात वाढ देखील केली आहे.
20 नवीन बाबी केल्याचा आपल्याला आनंद असून गोकुळचे चाचणी लेखा परीक्षणात कोणतेही तथ्य नसून राजकीयद्वेशा पोटी विरोधक हे करत असल्याचा त्यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.