
रणजीत माजगावकर
Kolhapur Fire News: कोल्हापूर शहरातून एक आगीचं वृत्त हाती आलं आहे. कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर सिग्नलजवळ एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली आहे. (Latest Marathi News)
कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर परिसरात असणाऱ्या बाजीराव संकुल या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून आज दुपारच्या सुमारास आगीचे लोट बाहेर पडताना दिसू लागले. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
सर्वात आधी या इमारतीला लागून असलेल्या पेट्रोल पंपावरील वाहने आणि गर्दी स्थानिकांनी हटवली. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली आहे.
दरम्यान, या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसलं तरी या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागलेल्या या इमारतीमध्ये एका खोलीत लक्ष्मी पाटील आणि मेघनाथ पाटील हे राहतात. त्यांच्या खालील खोलीमध्ये रामनाथ पाटील राहतात. इतर सर्व खोल्या रिकाम्या आहेत.
इमारतीतील खुल्या जागेमध्ये जुने फर्निचर आणि लाकडी वस्तू पडल्या होत्या. या घटनास्थळी अग्निशामक दलाचे अधिकारी तानाजी कवाळे, मनीष रणभिसे, अमित जाधव, मधुकर जाधव, रजाक मुलानी, मेहबूब जमादार, माणिक कुंभार, विशाल चौगुले यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. आग लागल्यानंतर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.