Kolhapur: उत्तर पोटनिवडणुकीच्या मैदानात करूणा शर्मा यांचे अर्ज दाखल

अनेक पुरावे समोर आणणार करुणा शर्मा
Karuna Sharma
Karuna SharmaSaam Tv

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Kolhapur) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांच्या नावाविषयी तांत्रिक मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. दरम्यान अर्ज दाखल केल्यावर त्यांनी सांगितले आहे की , माझ्याकडे सर्व कायदेशीर पुरावे आहेत. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ६-६ मुले आणि अनेक पत्नी लपवल्याचा आरोप (Allegations) देखील त्यांनी यावेळी केला आहे. या अगोदर आमच्या दोघांवर सिनेमा (Cinema) काढल्यावर तो हिट होईल असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे.

हे देखील पहा-

आज कोल्हापुरामध्ये (Kolhapur) बोलत असताना करुणा शर्मा म्हणाल्या की, आमच्या प्रेमकहाणीवर पुस्तक अंतिम टप्प्यामध्ये असून त्यामधून अनेक पुरावे समोर आणणार आहेत. या पुस्तकामध्ये २५ वर्षाची आमची कहाणी असणार आहे. यामध्ये पुराव्याबरोबरच लग्नाचे फोटो देखील असणार आहेत. हिंदी भाषेत हे पुस्तक लिहून झाले आहे. हिंदी आणि मराठी भाषेत हे पुस्तक असणार आहे. नावावरुन त्रुटी निर्माण होण्याच्या शक्यतेवर बोलताना त्यांनी सांगितले आहे की, माझ्याकडे जे पेपर आहेत त्याच्या आधारावर मी फॉर्म देखील भरला आहे. माझ्या कागदपत्रांमध्ये काही देखील त्रुटी नाहीत.

Karuna Sharma
PM Kisan: योजनेत परत करण्यात आला बदल; जाणून घ्या सर्वकाही..!

टेक्निकल प्रॉब्लेम तर माझ्या पतीच्या कागदपत्रांमध्ये आहेत. त्यांनी ६-६ मुले लपवली आहेत. अनेक पत्नी लपवले आहेत. तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे. माझ्या फॉर्ममध्ये काही देखील प्रॉब्लेम नाही, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. जगाला हे पुरावे लवकरच दिसतील, असे त्यांनी सांगितले आहे. करुणा शर्मा सांगितले आहे की, मला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आशिर्वाद आहे. कोल्हापूरची जनता मला विधानसभेमध्ये पाठवणार आहे असे त्या यावेळी म्हणाल्या आहेत. घराणेशाहीचे राजकारण संपवून कोल्हापूरचा विकास करणे हाच माझा उद्देश राहणार आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com