KMT Bus Service Resumes : संप मिटला; KMT ची बस सेवा आजपासून सुरु

विविध मागण्यांसाठी केएमटीच्या वतीने संप करण्यात आला हाेता.
kolhapur kmt workers resumes city bus service from today
kolhapur kmt workers resumes city bus service from todaysaam tv

- रणजित माजगावकर

Kolhapur News : कोल्हापूर महापालिका प्रशासनाने (kolhapur muncipal corporation) केएमटी कर्मचा-यांच्या मागण्यांना तत्वतः मान्यता दिल्याने शुक्रवारी रात्री उशिरा कर्मचा-यांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. त्यामुळे काल दिवसभर ठप्प झालेली कोल्हापुरातील केमटीची बस सेवा (kmt bus service resumes from today) आजपासून सुरू झाली आहे. (Maharashtra News)

kolhapur kmt workers resumes city bus service from today
Congress Party News : देशातील लोकशाही वाचवण्यासाठी जनतेनी साथ द्यावी : सतेज पाटील

सातवा वेतन आयोग लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी केएमटीच्या कर्मचा-यांनी शुक्रवारी संप पुकारला. यामुळे काेल्हापूरातील बस सेवा ठप्प झाली हाेती. परिणामी हजारो प्रवाशांचे हाल झाले. संपूर्ण शहरात दिवसभरात 40 ते 50 हजाराहून अधिक नागरिक केमीटतून प्रवास करतात. संपाचे अनुषंगाने महापालिका प्रशासनाने आंदाेलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.

या चर्चेनंतर केएमटीच्या कर्मचा-यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या महानगरपालिकेने तत्वत: मान्य केल्याने रात्री उशिरा हा संप मागे घेण्यात आलेला आहे.

चर्चेअंती झालेले निर्णय

1) सातवा वेतन आयोग प्रस्ताव 30 एप्रिल पूर्वी राज्य शासनाला पाठवणे.

2) रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव 15 दिवसात तयार करणे.

3) 25% महागाई भत्ता एप्रिल मे मधील पगारात समाविष्ट करणे.

4) के बॅचमधील कर्मचाऱ्यांचा सी बॅचमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे.

5) बसचे वेळापत्रक युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तयार करणे.

या मागण्या केएमटीच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत. या मागण्यांना कोल्हापूर महापालिका प्रशासनाने तत्वतः मान्यता दिल्याने अखेर रात्री उशिरा हा संप मागे घेण्यात आल्याचे शिष्टमंडळाने नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com