कोल्हापूरची विधान परिषद निवडणूक बिनविरोध; अमल महाडिक अर्ज मागे घेणार

दरम्यान महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती.
कोल्हापूरची विधान परिषद निवडणूक बिनविरोध; अमल महाडिक अर्ज मागे घेणार
कोल्हापूरची विधान परिषद निवडणूक बिनविरोध; अमल महाडिक अर्ज मागे घेणारSaam TV

कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे. कोल्हापूर विधान परिषदचे भाजपचे उमेदवार अमल महाडीक उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. अर्ज माघारीसाठी थेट दिल्ली वरून महाडिक कुटुंबीयांना फोन आला आहे. काँग्रेसचे उमेदवार गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईचीही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे हे देखील बिनविरोध निवडणून येण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरची विधान परिषद निवडणूक बिनविरोध; अमल महाडिक अर्ज मागे घेणार
Mumbai | मुंबईची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार; पाहा Video

दरम्यान महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. भाजपने कोल्हापूर, नागपूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबई अशा पाचही जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी याआधी मुंबई आणि आता कोल्हापूरची निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपने काँग्रेसमधून आलेल्या तीन उमेदवारांना उमेदवारी दिलेली होती. धुळे- नंदुरबार मतदारसंघाचे उमेदवार अमरिश पटेल (Amrish Patel), मुंबईतून संधी मिळालेले उमेदवार राजहंस सिंग (Rajhans Dhananjay Singh) आणि कोल्हापूर मतदारसंघातून तिकीट मिळालेले अमल महाडिक (Amal Mahadik) हे तिघेही मूळ काँग्रेसचे नेते होते. त्यापैकी अमल महाडिक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

कोल्हापूरमधील पक्षीय बलाबल

विद्यमान- सतेज पाटील

एकूण मतदार (415)

कोटा (209)

काँग्रेस (50), राष्ट्रवादी (54), शिवसेना (54), जनता दल (16), स्वाभिमानी (02), स्थानिक आघडी (87), भाजप (85), ताराराणी (36), जनसुराज्य (27), अपक्ष (11).

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com