कोल्हापूर- मुंबई विमानसेवा ठप्प, व्हाया बंगळूरचा दर वाढला

प्रत्येक फ्लाईटमधून सुमारे ४५ प्रवासी प्रवास करीत असल्याची आकडेवारी नुकतीच समाेर आली हाेती. तरीही विमान सेवेत सातत्य राहत नसल्याने ही सेवा बंद राहणार की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोल्हापूर- मुंबई विमानसेवा ठप्प, व्हाया बंगळूरचा दर वाढला
aeroplane

काेल्हापूर : राज्य परिवहन महामंडाळाच्या कर्मचा-यांनी संप पुकारल्याने काेल्हापूरवासियांना परगावी जाण्यासाठी खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. या संप काळात रेल्वेसह विमानसेवेला aeroplane नागरिकांनी प्राधन्य दिले. परंतु काेल्हापूर मुंबई kolhapur mumbai flight विमानसेवा सातत्याने तांत्रिक कारणामुळे बंद राहत आहे. या आठवड्यातील सुमारे तीन उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप झाला. विमानतळ प्राधिकरणाने आणि लाेकप्रतिनिधींनी यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी प्रवाशांतून हाेत आहे. kolhapur mumbai flight cancellations msrtc

aeroplane
सेना मंत्र्यास जीवे मारण्याची धमकी नव्हे; त्यांचीच स्टंटबाजी

काेल्हापूर विमानतळावरुन काेल्हापूर-मुंबई मार्गावर दुपारच्या (मंगळवार, बुधवार आणि गुरुवार) सुमारास विमानसेवा आहे. या विमानसेवेला प्रवाशांचा नेहमीच उत्तम प्रतिसाद लाभला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून ही विमान सेवा खंडीत हाेत आहे. या सेवेच्या अनियमिततेमुळे ती बंद हाेणार की काय अशी भिती नित्यनेमाने काेल्हापूरहून विमानाने मुंबईला जाणा-या प्रवाशांना वाटू लागली आहे. तर नवख्या प्रवाशांना आत्ता दिवाळी सुटीनंतर विमानात बसण्याचा आनंद घ्यायचा हाेता परंतु उड्डाण रद्द झाल्याने त्यांच्यात नाराजी पसरली. दरम्यान एसटी कर्मचारी यांनी पुकारलेल्या संपानंतर अनेकजण मुंबईला जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देताहेत. विमान सेवेकडे देखील नागरिक वळू लागलेत परंतु दर पाहून त्यांना धक्का बसत आहे.

काेल्हापूर- हैद्राबाद आणि काेल्हापूर बंगळूर मार्गे मुंबई अशी विमान सेवा आहे. परंतु या मार्गे जाणा-या फ्लाईटचे तिकीट हे जादा आहे. या मार्गावरील फ्लाईटचे तिकीत दुप्पटीने वाढल्याने प्रवासी त्यास प्रतिसाद देत नाही. मुंबईला जाण्यासाठी येथून पाच ते सात हजार रुपये आकारले जात आहेत. येत्या १८ नाेव्हेंबरपर्यंत त्याचा दर हा साडे नऊ हजार रुपयांपर्यंत पाेचल्याचे एका प्रवाशाने नमूद केले.

Edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com