Video पहा : काेल्हापूरकरांचा पैसा महापालिका घालतेय पाण्यात?

Video पहा : काेल्हापूरकरांचा पैसा महापालिका घालतेय पाण्यात?
kolhapur

कोल्हापूर : काेल्हापूर महापालिका ठेकेदारांना पाेसण्यासाठी अजून काय काय करणार आहे असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विचारु लागले आहेत. भर पावसात रस्त्यावरील झाडांना महानगरपालिकेच्या टँकरमधून पाणी घातलं जात असल्याचे वृत्त साम टीव्हीने नुकतेच दाखवले. त्यानंतर साम टीव्हीचा व्हिडिओ कोल्हापूरात व्हायरल होऊ लागला आहे. या प्रकारामुळे काेल्हापूर kolhapur महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत हाेत आहे.

दरम्यान संबंधित पाण्याचा टँकर पंक्चर झाल्याने तो रिकामा करण्यासाठी झाडाला पाणी घातल असल्याचे स्पष्टीकरण महानगरपालिकेकडून देण्यात आले आहे. दरम्यान टँकर पंक्चर असेल तर तो वेगात कसा चालवला गेला आणि ताेही चालला कसा असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

kolhapur
साताऱ्यातील बाजारपेठेत काेविड १९ RT-PCR तपासणी मोहीम सुरु

खरं तर हे सगळं ठेकेदारांना पाेसण्यासाठी केले जात आहे. पंक्चर टॅंकर चालविणे म्हणजे टायर ट्यूबचे पण नुकसानच ना मग हा कारभार ढिसाळ म्हणायचाच ना असा प्रतिप्रश्न सामाजिक कार्यकर्ते शुभम शिरगुप्पे यांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com