VishalGad News : शिवप्रेमींनाे ! विशाळगडाबाबत पुरातत्त्व विभागानं घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या

या पार्श्वभूमीवर पाच पथकांकडून विशाळगडावर विशेष मोहीमही राबवण्यात आली होती.
VishalGad, Kolhapur,
VishalGad, Kolhapur, saam tv

- रणजीत माजगावकर

Vishalgad News : विशाळगडावरील (vishalgad) कायदा सुव्यवस्था आणि विद्रूपीकरण रोखण्यासाठी पुरातत्त्व विभागाने नुकताच एक आदेश जारी केला आहे. या आदेशानूसार किल्ले विशाळगडावर पशु आणि पक्षांची हत्या करून त्यांचे अन्न शिजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. (Maharashtra News)

VishalGad, Kolhapur,
SSC Result 2023 : वयाच्या ५४ व्या वर्षी दहावीत मिळविले ५४ टक्के, वाचा भगत आजींची Success Story

किल्ले विशाळगडावर (Vishalgad) मोठ्या प्रमाणात पर्यटकांकडून विशेषत: युवा वर्गाकडून दारु, तंबाखूजन्य पदार्थ, गांजा अशा गाेष्टींची विक्री आणि सेवन केले जात हाेते असे प्रकार समाेर आले. काही युवक गडावर हुल्लडबाजी देखील करीत असतात. या घटनांचा वाढता प्रमाण लक्षात घेता तसेच विशाळगडावर शिजविले जाणार मासं राेखण्यासाठी यासर्व गाेष्टींना प्रतिबंध करण्याची मागणी काेल्हापूरात होत होती.

VishalGad, Kolhapur,
Nashik News : जितेंद्र आव्हाडांनी सिंधी समाजाची माफी मागावी, अन्यथा...

एसपी शैलेश बलकवडे यांनी या घटनांची गंभीर देखील घेत अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पाच पथकांकडून विशाळगडावर विशेष मोहीमही राबवण्यात आली होती.

VishalGad, Kolhapur,
Shivrajyabhishek Sohala 2023 : छत्रपतींची पालखी पाेहचताच 'तुमचं आमचं नातं काय ?, जय जिजाऊ जय शिवराय' घाेषणांनी राजसदर दुमदुमला (पाहा व्हिडिओ)

दरम्यान आता विशाळगडावरील कायदा सुव्यवस्था आणि विद्रूपीकरण रोखण्यासाठी पुरातत्त्व विभागानं पुढाकार घेत एक आदेश जारी केला आहे. किल्ले विशाळगडावर पशू-पक्षांची हत्या करून त्यांचं अन्न शिजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुरातत्व विभागानं (kolhapur) जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचे शिवप्रेमींकडून जाेरदार स्वागत करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com