Kunbi Certificate: कुणबी दाखला वाटपामध्ये मोठा भ्रष्टाचार, ५० हजारांची मागितली जातेय लाच; अनेकांच्या तक्रारी

Kunbi Certificate Corruption: कुणबी दाखल काढण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहे. साम टीव्हीला ही एक्स्क्लुझिव्ह माहिती मिळाली आहे.
कुणबी दाखला मराठी न्यूज
कुणबी दाखला मराठी न्यूजSaam TV

रणजित मांजगावकर, साम टीव्ही

Kunbi Certificate Corruption: एकीकडे मराठा आंदोलन आणि मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं असताना दुसरीकडे कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुणबी दाखल काढण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहे. साम टीव्हीला ही एक्स्क्लुझिव्ह माहिती मिळाली आहे.  (Latest Marathi News)

कुणबी दाखला मराठी न्यूज
Weather Alert: महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत धुव्वांधार पाऊस होणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून अलर्ट

कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) कुणबी दाखला वाटपात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटचे सूत्रधार आणि पैसे मागणारे आपले सरकार केंद्रचालक असल्याचा अनेकांनी आरोप केला आहे. कुणबी दाखला (Kunbi Certificate) काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आलेल्या व्यक्तींकडील कागदपत्रे पाहून दर सांगितले जातात.

त्यानंतर सांगेल तितके पैसे दिले, तर दाखल्यासाठीची पुढची कारवाई सुरू होते. जर एखाद्या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला, तर पूर्वीच्या कागदपत्रांतील ‘कु’चे कुळवाडी म्हणजे मराठा आहे, असे म्हणून तुम्हाला दाखला मिळणार नाही, असे स्पष्ट उत्तर आपले सरकार केंद्रचालकाकडून मिळत असल्याचा आरोप अनेक नागरिकांनी केला आहे.

कुणबी दाखला मराठी न्यूज
Pune News: दहीहंडी फुटताच आप्पा बळवंत चौकात राडा; ढोल ताशा पथक अन् गोविंदामध्ये तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

कुणबी दाखल्यासाठी दिलेल्या पैशांमध्ये तलाठी, सर्कल, नायब तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालय वाटेकरी असतात, असा आरोपही अनेक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पैसे दिले की कुणबीचा दाखल कुणीही काढू शकतो, असाच प्रकार कोल्हापूरमध्ये सुरू असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसींचा विरोध

दरम्यान,मराठ्यांना कुणबी समाजाद्वारे आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर कुणबी समाजाने तीव्र आक्षेप घेतला आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका, असं कुणबी संघटनांनी म्हटलं आहे. जर राज्य सरकारने दबावात येऊन निर्णय घेतला, तर मराठा समाजापेक्षाही देशभरात मोठं आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे सरकारची चौफेर कोंडी होण्याची शक्‍यता आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com