Gokul Milk Price : गोकुळ दुधाच्या दरात वाढ; १ ऑगस्टपासून लागू होणार नवे दर

गोकूळ दुध संघाने दुधाच्या विक्री दरात 2 रुपयांची वाढ केली आहे.
Goul Milk Latest News
Goul Milk Latest NewsSaam TV

कोल्हापूर : आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. महागाईचा आगडोंब सुरू असतानाच गोकुळ दूध संघाने दरवाढीचा दणका दिला आहे. गोकूळ दुध संघाने दुधाच्या विक्री दरात 2 रुपयांची वाढ केली आहे. उद्यापासून म्हणजेच रविवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. (Gokul Milk Price Hike Latest News)

Goul Milk Latest News
'संकेतचा वडील असल्याचा अभिमान'; वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळाल्यानंतर वडिलांची पहिली प्रतिक्रिया

गोकुळकडून प्रतिलिटर दूध विक्री दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये 1 लिटर दुधासाठी 66 रुपये मोजावे लागतील. याशिवाय दूध खरेदी दरातही वाढ केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Gokul Milk Latest News)

Goul Milk Latest News
Arjun Khotklar : दानवेंना म्हटलं, यावेळी मला लोकसभा लढू द्या; खोतकर काय म्हणाले? वाचा...

म्हशीच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची तर गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, दुध दरवाढीचा हा निर्णय 27 जुलै रोजी घेण्यात आला होता. अशी माहिती कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाचे अध्‍यक्ष विश्‍वास पाटील यांनी दिली.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com