
गडहिंग्लज: नदी उलट्या दिशेने वाहू लागली तर?...जरा आश्चर्य वाटलं ना? होय हे खरं आहे. कोल्हापूरमध्ये हा प्रकार घडला आहे. हिरण्यकेशी नदीवर गोटूर बंधारा आहे. या बंधाऱ्याजवळ नदीपात्रातील पाणी उलट्या दिशेनं वाहू लागलं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पंचक्रोशीतील नागरिक ही अद्भूत घटना बघण्यासाठी थेट बंधाऱ्याजवळ पोहोचले. तिथे नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. (Kolhapur News)
उलट्या दिशेने पाण्याचा प्रवाह
कोल्हापुरातील हिरण्यकेशी नदी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. या नदीवर गोटूर बंधारा असून, त्याच्याजवळ शनिवारी सायंकाळी एक आश्चर्यकारक घटना घडली. कर्नाटकात मुसळधार पाऊस (Rain Update) कोसळला. ओढ्याचे पाणी वाहून हिरण्यकेशी नदीत आले. पण हा पाण्याचा प्रवाह पूर्वेला कर्नाटकात वाहून न जाता उलट्या दिशेने म्हणजेच पश्चिमेकडे राष्ट्रीय महामार्गाकडे वाहायला लागले.
कर्नाटकातील निडसोशी, कमतनूर, गोटूर व पंचक्रोशीत ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस झाला. यामुळे या भागातील 'कापूर' नावाने ओळखल्या जाणारा ओढा दुथडी वाहू लागला. हिरण्यकेशी नदीवरील गोटूर बंधार्याच्या पूर्वेला (कडलगेच्या दिशेला) नदीपात्रात येऊन मिळाला आहे. ओढ्याचे हे पाणी थेट नदीपात्रात आले. पण आश्चर्य म्हणजे ते वाहून आलेले पाणी पूर्वेकडे न जाता पश्चिमेकडे जात होते.
नव्या बंधार्यातून पश्चिमेला राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने हे पाणी वाहू लागले. महामार्गावरील पूलापर्यंत हे पाणी गेले. नांगनूरच्या जॅकवेलजवळचे नदीपात्रही पाण्याने भरले. नदीचं (River) पाणी उलट दिशेने वाहू लागल्याचं वृत्त पंचक्रोशीत वाऱ्यासारखं पसरलं. त्यामुळं नागरिकांनी गोटूर बंधाऱ्याजवळ प्रचंड गर्दी केली होती. काही जण हा दुर्मिळ क्षण मोबाइलमध्ये कैद करत होते.
१५ वर्षांपूर्वीही असंच घडलं होतं...
१५ वर्षांपूर्वीही असाच काहीसा प्रकार घडला होता. त्यावेळी मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यावेळी या ओढ्याचं पाणी नदीपात्रात आलं. ते पश्चिमेकडे वाहत होतं. नांगनूर परिसरातील काही नागरिकांनी ही आठवण सांगितली.
ओढ्याचं पाणी ज्या ठिकाणी नदीला जाऊन मिळतं, तिथून पश्चिमेकडे काहीसा उतार आहे. ओढ्यातून पाण्याचा प्रवाह वेगाने आला आणि तो पश्चिमेच्या दिशेने वाहू लागला, असं सांगितलं जात आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.