Kolhapur News: नवनीतने छापलेल्या चुकीच्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांचा पेपर हुकला, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

Kolhapur News: नवनीत कंपनीने छापलेल्या या चुकीच्या टाईम टेबलमुळे कोल्हापुरातील अनेक विद्यार्थ्यांचा 10वीचा पेपर बुडल्याची माहिती समोर आली आहे.
Navneet printed wrong timetable
Navneet printed wrong timetableSAAM TV

> >रणजित माजगांवकर, कोल्हापूर

Kolhapur News: नवनीत कंपनीने अतिशय महत्त्वाची असलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक चुकीचे छापल्याने विद्यार्थ्यांच्या पेपर चुकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवनीत कंपनीने छापलेल्या या चुकीच्या टाईम टेबलमुळे कोल्हापुरातील अनेक विद्यार्थ्यांचा 10वीचा पेपर बुडल्याची माहिती समोर आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, इयत्ता दहावी बोर्डाचा हिंदीचा नियोजित पेपर 8 मार्च रोजी होता. मात्र नवनीतने तो पेपर 9 मार्चला छापला होता. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी केवळ नवनीतचे वेळपत्रक पाहिले ते 8 मार्चला या पेपरला गेलेच नाही. त्यामुळे त्यांची हिंदीच्या पेपरला गैरहजेरी लागली.

Navneet printed wrong timetable
Mumbai Mega Block : मुंबई लोकल प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! रविवारी घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या कोणत्या मार्गावर असेल मेगाब्लॉक?

नवनीतने दिलेल्या चुकीच्या वेळापत्रकामुळे आता हा पेपर चुकलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. कोल्हापूरमध्ये हा प्रकार समोर आला असला तरी राज्यात असे खूप विद्यार्थी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

Navneet printed wrong timetable
Sadanand Kadam: मोठी बातमी! सदानंद कदम यांना ईडीकडून अटक; अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; ४ तासांच्या चौकशीनंतर कारवाई

इयत्ता दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असती. या परीक्षेवर विद्यार्थ्याची पुढील शैक्षणिक वाटचाल ठरणार असते. अशा या महत्त्वाच्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबात संभ्रम निर्माण झाला तर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ जाऊ शकते. नवनीतच्या या चुकीच्या वेळपत्रकावर आता शासन काय करवाई करणार हे पाहावे लागेल. (Kolhapur news)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com