Kolhapur : कोल्हापुरातील 'सुंदर' हत्तीचं कर्नाटकात निधन; माहिती न दिल्यानं भक्तांमध्ये नाराजी

कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा समूहाकडून आमदार विनय कोरे यांच्यामार्फत श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिरास हत्ती भेट म्हणून देण्यात आला होता.
Kolhapur Sundar Elephant Death
Kolhapur Sundar Elephant DeathSaam TV

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा समूहाकडून आमदार विनय कोरे यांच्यामार्फत श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिरास हत्ती भेट म्हणून देण्यात आला होता. या हत्तीचं नाव सुंदर असं ठेवण्यात आलं होतं. त्याचे 27 ऑगस्टला निधन झाले. कोल्हापुरातून (Kolhapur) कर्नाटकमध्ये गेलेल्या भक्तांना ही बातमी समजताच, त्यांनी कोल्हापुरात ही बातमी पोहोचवली. कर्नाटक प्रशासनाने सुंदरच्या निधनाची बातमी लपवून ठेवल्यामुळे त्यांच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. (Kolhapur News Today)

Kolhapur Sundar Elephant Death
Bacchu Kadu : कोर्टात जाणार, शिंदे-फडणवीसांना नोटीस पाठवणार; बच्चू कडू काय म्हणाले, वाचा...

दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबाच्या मंदिरात सेवा म्हणून वारणा समूहाकडून आमदार विनय कोरे यांनी हिमाचल प्रदेश मधून सुंदर हत्ती आणून देवस्थानला भेट दिली होती. सुरूवातीला हा हत्ती वारणानगर इथे वास्तव्यास होता. या काळात पेटा या संस्थेने हत्तीचा छळ होतो, त्याची साखळदंडातून मुक्तता करून प्राणीसंग्रहालयात सोडावं, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. (Latest Marathi News)

यानंतर वारणेतून कर्नाटक इथल्या बाणेरगट्टा पार्कमध्ये सुंदरला नेण्यात आलं होतं. कोल्हापूर इथले काही ज्योतिबा भक्त दीड- दोन महिन्यातून केळी, सफरचंद घेऊन खास सुंदरला भेटण्यासाठी जात आहेत. चार दिवसांपूर्वी ते तिथे गेले असता, तिथल्या प्रशासनाने सुंदर हत्तीचं 27 ऑगस्ट रोजी निधन झाल्याचे सांगितलं.

या भक्तांनी ही बातमी कोल्हापूर देवस्थान आणि आमदार विनय कोरे यांना कळविली. सुंदरचं निधन झाल्याची बातमी कर्नाटक प्रशासनाने का लपवली असा प्रश्न आमदार विनय कोरे यांनी विचारलेला आहे. तसंच त्यांच्या कारभाराबाबत नाराजी देखील व्यक्त केलेली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com