Chain Snatching Video: कोल्हापुरात रस्त्याने एकटी जात असलेल्या महिलेसोबत घडला भयानक प्रकार! घटना CCTV मध्ये कैद

Chain Snatching in Kolhapur : कोल्हापुरातील सानेगुरुजी वसाहत परिसरात ही घटना घडली. याठिकाणी आज सकाळी एक महिला सोसायटीमधीलच गणपती मंदिरात दर्शना निघाली होती.
Chain Snatching in Kolhapur
Chain Snatching in KolhapurSAAM TV

>>रणजीत माजगावकर, कोल्हापूर

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये रस्त्याने एकटी जाणाऱ्या महिलेला धक्कादायक प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. गणपती मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून चोरट्याने पळ काढल्याची घटना घडली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरातील सानेगुरुजी वसाहत परिसरात ही घटना घडली. याठिकाणी आज सकाळी एक महिला सोसायटीमधीलच गणपती मंदिरात दर्शना निघाली होती. मंदिर जवळच असल्याने ती एकटी निघाली. परंतु रस्त्यात तिला एकटी पाहून चोरट्यांनी डाव साधला.

Chain Snatching in Kolhapur
Nashik Crime News: अंधश्रद्धेचा बळी! डॉक्टरकडे नाही भोंदूबाबाकडे गेला, तरुण पुन्हा परतलाच नाही; नाशिकमधील धक्कादायक घटना

ही महिला रस्त्यावरून जात असताना बाईकवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्यांनी हिसकावली आणि तेथून लगेच पळ काढला. ही घटना घडली तेव्हा महिला एकटी असल्याने तिने आरडाओरड केली परंतु तिथे कोणीच आले नाही. या घटनेने महिला हादरून गेली आहे. ही संपूर्ण घटना तेथे परिसारत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Kolhapur Crime)

Chain Snatching in Kolhapur
Mangalvedha News : मंगळवेढा पोलिसांची मोठी कारवाई, 42 लाखांचा गुटखा जप्त; चाैघांवर गुन्हा दाखल

सीसीटीव्हीत दिसणाऱ्या फूटेजनुसार हे चोरटे ज्या दुचाकीवरून आले होते ती कर्नाटक पासिंगची असल्याचे दिसत आहे. तसेच दोन चोरट्यांनी महिलेची चेन हिसकावून दुचाकीवरून पलायन केल्याच दिसत आहे. दिवसाढवळ्या चोरट्यांनी महिलेच्या चेनवर डल्ला मारल्याने परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Chain Snatching )

येथे पाहा व्हिडिओ...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com