Kolhapur News : अन्यायी टाेल बंद झालाच पाहिजे.., प्रवाशांची लूट थांबलीच पाहिजे... स्थानिकांसह पर्यटकांची आंबा विशाळगड टाेल वर चाल

हा टोल बंद करण्यासाठी पर्यटक आणि स्थानिकांनी वारंवार प्रशासनाला विनंती केली.
kolhapur, amba vishalgad
kolhapur, amba vishalgadsaam tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : पर्यटकांवर आर्थिक बाेजा पडत असल्याचे कारण सांगत आज (मंगळवार) स्थानिकांनी आणि पर्यटकांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबा विशाळगड (amba vishalgad) मानोली ग्रामपंचायत परिसरतील प्रवासी वसुली टोल नाका हटविला. यावेळी आंदाेलकांनी जाेरदार घाेषणाबाजी केली. (Maharashtra News)

kolhapur, amba vishalgad
Udayanraje Bhosale On Sharad Pawar : विश्वासघात... उदयनराजेंनी एका वाक्यात शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्याचा घेतला समाचार

कोल्हापूर जिल्ह्यातील अंबा विशाळगड या परिसरात येणाऱ्या पर्यटकांवर मानोली ग्रामपंचायत अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वनपरिक्षेत्र मलकापूर यांच्यावतीने प्रवासी वसुली टोल नाका उभारला गेला. या टोल नाक्यामुळे या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना नाहक आर्थिक भुर्दंड साेसावा लागत हाेता. हा टोल बंद करण्यासाठी पर्यटक आणि स्थानिकांनी वारंवार प्रशासनाला विनंती केली.

kolhapur, amba vishalgad
Shevgaon Bandh News : शेवगाव बेमुदत बंद; पालकमंत्र्यांच्या आवाहानंतरही व्यापारी ठाम, आजही बाजारपेठेत सन्नाटा

मात्र प्रशासनाने त्यावर काेणताच निर्णय घेतला नाही. अखेरीस आज (मंगळवार) स्थानिकांनी आणि काही पर्यटकांनी हा टोल नाका हटवला. मनमानी टोल वसूल केला जात असल्याच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

या टोल नाक्यावर वसुलीसाठी नेमलेली मुलं ही मानोली गावातील असून त्यांना वन विभागाचा पोशाख दिलेला होता. त्यांच्याकडे कसलेही ओळखपत्र नव्हते. ते वन विभागाचे कर्मचारी असल्याचे सांगून दमदाटी करीत असे अशी वारंवार अनेक जण तक्रारी करीत असतं. अखेर आज हा टोल नाका स्थानिक आणि काही पर्यटकांनी हटवलेला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com