सत्यजीत कदम यांची पराभवानंतर पहिलीच प्रतिक्रिया; केला 'हा' आरोप

- कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे.
सत्यजीत कदम यांची पराभवानंतर पहिलीच प्रतिक्रिया; केला 'हा' आरोप
Satyajeet KadamSaam Tv

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा (Election) निकाल हाती आला आहे. यात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) या १९ हजारांच्या मताधिक्यानं विजयी झाल्या. तर भाजप उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव झाला आहे. पराभवानंतर सत्यजीत कदम यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सत्यजीत कदम म्हणाले की, निवडणुकीत एक उमेदवार जिंकतो आणि एक पराभूत होतो. इथं तीन पक्ष एकत्र लढले आणि एक पक्ष वेगळा लढला. भाजप एकटा लढूनसुद्धा ७७ हजार मते मिळाली. कोल्हापूर शहरातील ५ ते ६ हजार मतदारांची नावे गायब झाली आहेत, असा आरोप सत्यजीत कदम यांनी यावेळी केला.

हे देखील पहा -

राज्यात अतिशय प्रतिष्ठेची ठरलेली निवडणूक म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभेची निवडणूक. राज्यातील सर्वच मातब्बर नेते कोल्हापुरात तळ ठोकून होते. आज त्या निवडणुकीचा निकाल लागला. कोल्हापूर उत्तरच्या मतदारांनी आपल्या निवडणुकीचा कौल महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बाजूने दिलेला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना ९२०१२ एवढी मतं पडली आहेत. त्यांनी भाजपच्या सत्यजीत कदम यांचा पराभव केला आहे.

स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर या जागेवर पोट निवडणूक लागली होती. त्यात महाविकास आघाडीकडून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि आता त्यांचा विजय झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com