१०० सेकंदांसाठी कोल्हापूर स्तब्ध; लोकराजा शाहू महाराजांना दिली अनोखी मानवंदना

Shahu Maharaj Smriti Centenary Year : या सर्व कार्यक्रमांसाठी कोल्हापूरकरांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला.
Shahu Maharaj life story, Shahu maharaj punyatithi
Shahu Maharaj life story, Shahu maharaj punyatithiSaam Tv

कोल्हापूर: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे हे स्मृती शताब्दी वर्ष आहे. आज (६ मे) ला शाहू महाराजांची १०० वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्त कोल्हापूरमध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Lokraja Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) कृतज्ञता पर्वाचं (Smriti Centenary Year) आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांना कृतज्ञता वाहण्यासाठी १०० सेकंद स्तब्ध आणि मौन राहत कोल्हापूरकरांनी (Kolhapur) लोकराजांंना अनोखी मानवंदना दिली आहे. १८ एप्रिल ते २२ मे दरम्यान आयोजन करण्यात आलेल्या या उत्सवाचा मुख्य सोहळा आज (६ मे) ला होत आहे. (Kolhapur paused for 100 seconds! A unique tribute to Lok Raja Chhatrapati shahu maharaj)

हे देखील पाहा -

राजश्री छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना देताना अख्खं कोल्हापूर स्तब्ध झालं होतं. कोल्हापूरकर चौका-चौकात एकत्र आले आणि १०० सेकंद स्तब्ध राहिले. काहींनी आहे तिथूनच महाराजांना मानवंदना दिली. गजबलेलं कोल्हापूर १०० सेकंदांसाठी स्तब्ध होतानाचं दृष्य ऐतिहासिक तर होतंच. पण तेवढंच भावनिकही होतं. २२ मेपर्यंत सुरू राहणाऱ्या या कृतज्ञता पर्वात युवा पिढीसाठी वक्तृत्व स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, सायकल फेरी, कोल्हापूरातील ऐतिहासिक वास्तूंच्या निवडक रेखाचित्रांचं प्रदर्शन भरवलं जाणार आहे. शाहु महाराजांच्या कार्यावर आधारित शंभर व्याख्यानं, शाहु फुटबॉल लीग, शाहु केसरी कुस्ती स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १०० सेकंद स्तब्धता पाळून लोकराजाला आदरांजली वाहिल्यानंतर चित्ररथ मिरवणूकही काढण्यात आली. तसेच नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकराजा स्टर्टअप आणि गुंतवणूकदार परिषद, कोल्हापूर मसाला आणि मिर्ची जत्रा, कोल्हापूरी चप्पल जत्रा, राधानगरी निसर्ग पर्यटन, धरण परिसर भ्रमंती असे अनेक कार्यक्रम या निमित्तानं होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांसाठी कोल्हापूरकरांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. (Shahu Maharaj punyatithi)

Shahu Maharaj life story, Shahu maharaj punyatithi
Video : चेन खेचल्याने नदीच्या पुलावर थांबली ट्रेन; सहाय्यक लोको पायलटनं दाखवलं धाडस

शाहू महाराजांचा थोडक्यात जीवनपट (Shahu Maharaj life story)

शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, आणि 'शाहू' हे नाव ठेवले. सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

(माहिती स्त्रोत: विकिपीडिया)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com