Kolhapur : बहुचर्चीत काेल्हापूर घरफाळा घोटाळा प्रकरणी कर निर्धारक संजय भाेसले अटकेत

1 कोटी 85 लाखांच्या नुकसानीस संजय भाेसले हे स्वत: जबाबदार असून अहवालात याचा समावेश नाही असा आराेप देखील केला गेला.
kolhapur, sanjay bhosale
kolhapur, sanjay bhosaleSaam Tv

- रणजित माजगावकर

Kolhapur : राज्यातील बहुचर्चीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या (kolhapur muncipal corporation) घरफाळा घोटाळा प्रकरणी आज (गुरुवार) कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व अंतर्गत लेखापरीक्षक संजय भोसले (sanjay bhosale kohapur) याला पाेलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे या प्रकरणाची फिर्याद भाेसलेनेच पाेलिसांत दिली हाेती.

kolhapur, sanjay bhosale
Sangli : काय सांगता ! 'या' ज्वारीला मिळताेय तीनशे रुपये प्रति किलो दर

कोल्हापूर महानगरपालिकेत 3 कोटी 14 लाखांचा घरफाळा घोटाळा झाल्याची फिर्याद करनिर्धारक संजय भोसले यांनी दिल्यानंतर त्यांच्यावरच सातत्याने पदाधिका-यांकडून आराेप केले जात हाेते. प्रत्यक्षात या घोटाळ्यातील आठ पैकी सात प्रकरणात स्वतः संजय भोसले यांचा हात असल्याचा आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी केला हाेता.

घरफाळा घोटाळ्याचा आरोप होताच संजय भोसले यांनी चुकीच्या रकमा दाखवून चार कर्मचाऱ्यांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर या चारही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. मात्र यानंतर झालेल्या चौकशीत फिर्यादी असलेले संजय भोसले आरोपी असल्याचं दिसून येतंय त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी देखील हाेत हाेती.

kolhapur, sanjay bhosale
Supriya Sule : हे अतिशय संतापजनक आहे ! एसटी कर्मचारी आत्महत्येस सुप्रिया सुळेंनी सरकारला धरलं जबाबदार

महापालिकेने दिलेल्या अहवालात स्वतः संजय भोसलेच दोषी असल्याचं उघड झालं हाेते. आज लक्ष्मीपूरी पाेलिसांनी संजय भाेसले यास घरफळा घाेटाळा प्रकरणी अटक केली. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com