Kolhapur: नदीत गणेशमूर्ती विसर्जनास विरोध; हिंदुत्ववादी संघटना आणि प्रशासनामधील वाद चिघळला

वाहत्या पाण्यातच गणेश मूर्ती विसर्जन करणे उचित असल्याची हिंदुत्ववाद्यांची भूमिका.
Ganeshotsav Kolhapur News
Ganeshotsav Kolhapur NewsSaam TV

कोल्हापूर: राज्यभरात गणेशोत्सव (Ganeshotsav) उत्सहात पार पडत आहे. गणपती बाप्पांच्या आगमनानंतर आता गणपती विसर्जनची लगबग सुरु आहे. काही ठिकाणी दीड दिवसाचा तर काही ठिकाणी पाच दिवसांनंतर गणपती विसर्जन केलं जातं.

याच पार्श्वभूमीवर शहरांमध्ये प्रसासनाकडून कृत्रीम तलावांची निर्मिती करुन त्या ठिकाणी गणेश मूर्तीचे विसर्जन करावं असं आवाहन केलं जात आहे. नागरिक देखील आपल्याला सोयीस्कर असेल अशा ठिकाणी लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करत आहेत.

मात्र इचलकरंजीमध्ये (Ichalkaranji) गणेश मूर्ती विसर्जनावरुन जिल्हाधिकारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळतं आहे. पंचगंगा नदीत (Panchganga River) गणशे मूर्तींचं विसर्जन करता येणार नाही, अशी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी भूमिका घेतली आहे.

पाहा व्हिडीओ -

शिवाय विसर्जनासाठी शेततळ्याचे निर्मिती केली असून या तळ्यांमध्येच गणेश मूर्तीचे विसर्जन करावं, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती आणि त्यांच्या रंगामुळे पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी पंचगंगा नदीत गणशे मूर्तींचं विसर्जन करु नये अशी भूमिका घेतली आहे.

तर दुसरीकडे इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवडे यांनी पंचगंगा नदीमध्येच गणेश मूर्तींचे विसर्जन करणार असून वाहत्या पाण्यातच गणेश मूर्ती विसर्जन करणे उचित असल्याचं म्हटलं आहे. आवडे यांच्या भूमिकेला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी देखील समर्थन दिलं आहे.

Ganeshotsav Kolhapur News
Bullock Cart Race Ban : आयाेजकांनाे ! बैलगाडा शर्यतींवर आली बंदी; जाणून घ्या कारण

मात्र, विनाकारण चुकीच्या संकल्पना पसरवू नका, असं जिल्हाधिकारी रेखावर यांनी नदीत मुर्ती विसर्जन करण्यावर ठाम असणाऱ्यांना सांगितलं आहे. त्यामुळे आता हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची भूमिका आणि आवाडेच्या भूमिकेमुळे प्रशासन आणि आवाडे यांच्यामध्ये वाद झाला असून आता हा वाद आणखी चिघळणार की काही मध्यम मार्ग निघणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com