पाेलिस, मिलिट्री बाेलवा; दुकाने सुरु करण्यावर व्यापारी ठाम

पाेलिस, मिलिट्री बाेलवा; दुकाने सुरु करण्यावर व्यापारी ठाम
uddhav thackreay

सांगली/काेल्हापूर : आम्ही सामाजिक अंतराचे पालन करुन दुकानांमधील व्यवहार करु परंतु आता उपासमारीचे वेळ येण्यापुर्वी आम्ही दुकाने सुरु करणार असा ठाम निर्धार सांगली sangli आणि काेल्हापूर kolhapur जिल्ह्यातील व्यापा-यांनी केला आहे. पाेलिस बाेलवा, मिलिट्री बाेलवा आणखी काेणालाही बाेलवा आम्ही मागे हटणार नाही. सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करावा अन्यथा उद्रेकला सामाेरे जावे असा खणखणीत इशारा काेल्हापूरच्या व्यापा-यांनी सरकारला आज (गुुरवार, ता. 15) लाॅकडाउनमधील निर्बंधांवरुन दिला आहे. (kolhapur-sangli-traders-demands-unlock-city-uddhav-thackreay)

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार गेली अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे व्यापारी अस्वस्थ आहेत. व्यापा-यांबराेबर हजारो कामगारही घरातच आहेत. व्यापाऱ्यांची कर्जे, दुकाने भाडे, कामगारांचा पगार यामुळे त्यांच्या पुढच्या अडचणी वाढल्या आहेत. शासन पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्यामुळे प्रशासन जिल्ह्यात कडक निर्बंध लावत आहे. दूसरीकडे दुकाने बंद असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत. वाढती रुग्ण संख्या आणि लाॅकडाउनचे निर्बंध यामुळे प्रशासन आणि व्यापारी दोघेही हतबल झाले आहेत.

सांगली येथील व्यापा-यांनी मुख्यमंत्री साहेब व्यापाऱ्यांना घरातच बसून मारणार का? व्यापाऱ्यांमुळे कोरोना वाढतो का? आम्हाला जगू द्या अशी आर्त साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दुकाने बंद आहेत. व्यापाऱ्यांमुळे कोरोना वाढतो का? मग राजकीय कार्यक्रम होतात त्याने कोरोना वाढत नाहीत का? असा प्रश्न व्यापा-यांनी उपस्थित करुन आम्हाला घरातच बसून मारणार आहात का असे आम्हाला जगू द्या सांगलीच्या व्यापाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackreay यांना साद घातली आहे. अन्यथा येणाऱ्या काळात याचा उद्रेक होईल असा इशारा देखील व्यापा-यांनी दिला आहे.

दरम्यान सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भावा संदर्भात पाहणी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाचे टास्क फोर्समधील सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी अधिक प्रादुर्भाव असलेल्या वाळवा, पलूस आणि कडेगाव या तीन तालुक्यांची बुधवारी (ता.14) पाहणी केली. आज महापालिकेत बैठक घेऊन आरोग्य विभागास डाॅ. साळुंखे हे मार्गदर्शन करणार आहेत.

कोल्हापूरकर आक्रमक

कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार गेली शंभर दिवस बंद आहे. त्यामुळे व्यापारी अस्वस्थ आहेत. व्यापा-यांबराेबर हजारो कामगारही घरातच आहेत. व्यापाऱ्यांची कर्जे, दुकाने भाडे, कामगारांचा पगार यामुळे त्यांच्या पुढच्या अडचणी वाढल्या आहेत. शासन पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्यामुळे प्रशासन जिल्ह्यात कडक निर्बंध लावत आहे. दूसरीकडे दुकाने बंद असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत. वाढती रुग्ण संख्या आणि लाॅकडाउनचे निर्बंध यामुळे प्रशासन आणि व्यापारी दोघेही हतबल झाले आहेत. दुकाने उघडण्यासाठी व्यापारी आक्रमक झाले आहेत. आम्ही सामाजिक अंतराचे पालन करु व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जाेर धरु लागली आहे. कोल्हापुरातील राजारामपुरीतील व्यापारी वर्ग दुकाने सुरु झाली नाहीत तर उपासमारीचे वेळ येईल अशी भिती व्यक्त करीत आहेत.

uddhav thackreay
साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर सापडला ऐतिहासिक अमूल्य ठेवा

'राज्य सरकारला आणखी एक दिवसाची मुदत देतो. त्यानंतर पोलिस बोलवा किंवा मिलिट्री बोलवा दुकाने सुरू करणारच असा ठाम निर्धार 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त करुन एक प्रकारे राज्य सरकारला इशारा दिला आहे. गेल्या शंभर दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार कोरोनामुळे ठप्प झालेला आहे. आता दुकाने सुरू केली नाही तर व्यापारी आत्महत्या करतील अशी भिती देखील गांधी यांनी व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com