The Royal Kolhapur Horse Show: युवराज मालोजीराजे छत्रपतींनी द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो याची केली घाेषणा; जाणून घ्या वेळापत्रक

Malojiraje Chhatrapati: काेल्हापूरातील ही स्पर्धा म्हणजे अश्वप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे असेही युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी नमूद केले.
Kolhapur, malojiraje chhatrapati, the horse show
Kolhapur, malojiraje chhatrapati, the horse showsaam tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur News: कोल्हापुरातील पोलो ग्राउंडवर उद्यापासून (ता. दहा मार्च) द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो (royal horse show) याचे आयाेजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणा-या या द राॅयल हाॅर्स शाेमध्ये सुमारे 250 घाेडेस्वार सहभागी हाेणार असल्याची माहिती कोल्हापूर इक्वेस्ट्रियन असोसिएशनचे अध्यश्र युवराज मालोजीराजे छत्रपती (malojiraje chhatrapati) यांनी दिली.

Kolhapur, malojiraje chhatrapati, the horse show
Karad : कराड - मलकापूर उड्डाणपूल पाडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; जाणून घ्या वाहतुक मार्गातील नवा बदल

युवराज मालोजीराजे छत्रपती म्हणाले कोल्हापुरात 10, 11 आणि 12 मार्चला द रॉयल हॉर्स शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कोल्हापुरातील पोलो ग्राउंडवर होणाऱ्या द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो साठी पुणे, ठाणे, सातारा, अकलूज, कोल्हापूर,पन्हाळा आणि अतिग्रे अशा विविध ठिकाणाहून घोडेस्वार दाखल होत आहेत.

Kolhapur, malojiraje chhatrapati, the horse show
Viral Video : महिलांनी पुरुषांना काठीनं बदडलं ! जाणून घ्या Holi ची प्रथा परंपरा

या स्पर्धेसाठी 20 थरोब्रेड, 40 काठेवाड , 20 मारवाडी असे एकूण 80 घोडे तर 250 घोडेस्वार भाग घेत आहेत. चीफ पेट्रॉन शाहू छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे. काेल्हापूरातील ही स्पर्धा म्हणजे अश्वप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे असेही युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com