अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमातच लाच घेताना सापडल्या; आरोग्य उपसंचालक मॅडमवर आली तोंड लपवण्याची वेळ

आरोग्य उपसंचालिका असलेल्या भावना चौधरी यांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम मंजूर करण्यासाठी ५ हजाराच्या लाचेची मागणी केली होती.
Kolhapur Crime
Kolhapur Crimeविजय पाटील

कोल्हापूर: ऑफिसमध्ये अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम सुरू असतानाच आरोग्य उपसंचालक मात्र लाच घेण्यात व्यस्त असल्याचं चित्र कोल्हापूरात (Kolhapur) पहायला मिळालं आहे. कार्यक्रम सुरु असतानाच लाचखोर महिला अधीकाऱ्याचा पर्दाफाश करत लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतलं आहे. (Anti-corruption Department)

आरोग्य उपसंचालिका असलेल्या भावना चौधरी यांनी भविष्य निर्वाह निधीची (Provident Fund) रक्कम मंजूर करण्यासाठी ५ हजाराच्या लाचेची मागणी केली होती. एका बाजूला आरोग्य उपसंचालक कार्यालयात अमृतमहोत्सवी कार्यक्रम सुरू असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी हे काम मंजूर करण्यासाठी तक्रार दाराला कार्यालयात बोलवून घेतले होते.

पाहा व्हिडीओ -

यावेळी चौधरी यांनी ५ हजार रुपयांची लाच घेताना त्या लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात रंगेहाथ सापडल्या अन् ऑफिसमध्ये भावना चौधरी यांच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य उपसंचालक असलेल्या भावना चौधरी यांनी तक्रारदाराचे भविष्य निर्वाह निधीतीच्या ९० टक्के रक्कमेतील ६ लाख ७२ हजार रुपये मंजूर करण्यासाठी ६ हजार ७०० रुपयांची लाच मागितली होती.

Kolhapur Crime
भयंकर घटना! रक्षाबंधनासाठी निघालेल्या प्रवाशांची बोट बुडाली; ३० हून अधिक प्रवासी बेपत्ता

मात्र, तडजोडीअंती ५ हजार मागितले तक्रारदाराने लाचलुचपत विभागा प्रतिबंध विभागाकडे चौधरी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता भावना चौधरी यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे कार्यालयात सापळा लावला असता भावना चौधरी तक्रारदाराकडून ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडल्या.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com