ठरलं तर : हे हाेणार कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष

ठरलं तर : हे हाेणार कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष
kolhapur zilla parishad

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद kolhapur zilla parishad अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे राहुल पाटील rahul patil तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंतराव शिंपी यांचे नाव निश्चित झाले आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ hasan mushrif आणि पालकमंत्री सतेज पाटील satej patil यांनी श्री. पाटील आणि श्री. शिंपी यांच्या नावांची घोषणा केली आहे. अन्य पदाधिकाऱ्यांची नावे उद्या (मंगळवारी) जाहीर केली जाणार आहेत. (kolhapur-zilla-parishad-president-election-satej-patil-hasan-mushrif)

काेल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज (साेमवार) दुपारी निवड प्रक्रिया होणार आहे. काेल्हापूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. भाजप आणि मित्र पक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे राहुल पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे. राहुल पाटील हे आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र आहेत. दरम्यान संख्याबळ नसल्याने विरोधकांनी निवडी बिनविरोध पार पाडाव्यात असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com