Konkan Rain Update : दापोली- चिपळूणला सतर्कतेचा इशारा

भारतीय हवामान विभागातर्फे येत्या ४ दिवसात जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला
Konkan Rain Update : दापोली- चिपळूणला सतर्कतेचा इशारा
Konkan Rain Update : दापोली- चिपळूणला सतर्कतेचा इशाराSaam Tv

रत्नागिरी : भारतीय हवामान विभागातर्फे येत्या ४ दिवसात जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रात्रभर चिपळूण, दापोलीला पावसाने चांगलेच झोडपले आहे. तसेच जगबुडी, वाशिष्टी नदीमध्ये पाणी वाढल्याने परत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

मंडणगड, गुहागर, दापोली, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर मध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे.चिपळूणमध्ये जुन्या बाजार पूल या ठिकाणी देखील पाणी आले आहे. मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणी पातळी मध्ये चांगलीच वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी यावेळी केले आहे.

हे देखील पहा-

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तरी जिल्ह्यातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने यावेळी केले आहे. नागरिकांनी धाडसाने वाहन पाण्यामध्ये घालू नये.

Konkan Rain Update : दापोली- चिपळूणला सतर्कतेचा इशारा
सिद्धेश्वर धरणाचे दरवाजे उघडले; पूर्णा नदीपात्रात विसर्ग वाढला

अतिवृष्टीने वाहतूक विस्कळीत झाल्यास, सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. अनावश्यक ओव्हर टेक करू नये. वाहनांच्या ३- ३ रांगा करू नयेत. प्रवासात आवश्यक खबरदारी आणि काळजी घ्यावी. घरामध्ये पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तात्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. घराभोवती विजेचे खांब किंवा तारा, झाडे इत्यादी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूपासून लांबच राहावे.

पशुधन आणि अन्य पाळीव प्राणी यांना अगोदर सुरक्षित ठिकाणी हलवावे. जवळ दैनंदिन लागणारी औषधे, केरोसीन वर चालणारे बंदिस्त दिवे बॅटरी, गॅसबत्ती, काडीपेटी या वस्तू जवळ ठेवाव्यात. अतिवृष्टीचा फटका टाळण्याकरिता दरडप्रवण भागातील समुद्र आणि खाडी किनारी तसेच नदी किनारी राहणाऱ्या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com