Konkan Railway News: प्रवाशांनो लक्ष द्या! मान्सूनमुळे कोकण रेल्वेच्या वेळा बदलल्या, पाहा नवीन वेळापत्रक

प्रवाशांनो लक्ष द्या! मान्सूनमुळे कोकण रेल्वेच्या वेळा बदलल्या, पाहा नवीन वेळापत्रक
Konkan Railway News
Konkan Railway Newssaam tv

Konkan Railway News: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मान्सूनमुळे कोकण रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेची वेळ १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत बदलण्यात आली आहे. कोकणात यादरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.

'हे' आहे गाड्यांचे नवीन वेळापत्रक

नवीन वेळापत्रकनुसार, मंगळुरू सेंट्रल - मुंबई एलटीटी मत्सयगंधा एक्स्प्रेस (१२६२०) आता मंगळुरूहून १२.४५ वाजता निघेल. पूर्वी ही वेळ दुपारी 2.20 ची असायची. तर याच्या सोबती ट्रेन (१२६१९) मंगळुरु सेंट्रलला सकाळी ७.४० ऐवजी १०.१० वाजता पोहोचेल. (Latest Marathi News)

Konkan Railway News
Sanjay Raut News: 'देशात अंबानी आणि अडाणी दोनच शेतकरी'; संजय राऊत यांचा मोदी सरकारला खोचक टोला

ट्रेन क्र. १२१३३ मुंबई सीएसएमटी-मंगळुरु जंक्शन सुपरफास्ट एक्स्प्रेस येथे दुपारी १.०५ च्या ऐवजी दुपारी ३.४० वाजता पोहोचेल. तर रेल्वे क्रमांक 12134 येथून 4.35 वाजता सुटेल, जी आतापर्यंत दुपारी 2 वाजता सुटत होती.

तसेच 06602 मंगळुरु सेंट्रल - मडगाव डेली एक्स्प्रेस पहाटे 5.30 वाजता सुटेल आणि आता मडगावला दुपारी 1.10 ऐवजी 1.10 वाजता पोहोचेल. 06601 मडगावहून दुपारी 1.50 वाजता सुटेल आणि मंगळुरु सेंट्रलला रात्री 9.05 ऐवजी 9.40 वाजता पोहोचेल.

Konkan Railway News
Mumbai Crime News: हत्या करून झाला फरार, नाव बदलून विकत होता मिठाई; तब्बल 20 वर्षानंतर पोलिसांनी केलं अटक

16346 तिरुवनंतपुरम - मुंबई एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस मंगळुरुला रात्री 9.35 वाजता पोहोचेल. 16345 LTT सकाळी 11.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5.45 वाजता मंगळुरूला पोहोचेल.

दरम्यान, रेल्वेने पावसाळ्याच्या वेळापत्रकाच्या अधिसूचनेपूर्वी तिकीट बुक केलेल्या मार्गावरील प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या आगाऊ वेळेची माहिती करण्यास सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com