Konkan Railway News: कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कोकण कन्या एक्सप्रेस 5 तासापासून वीर रेल्वे स्थानकात उभी

Konkan Railway News: या ट्रेनला डिझेल इंजिन लावून गाडी पुढे नेण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे.
Konkan Railway News
Konkan Railway NewsSaam TV

सचिन कदम, रायगड

Raigad Latest News: कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हर हेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. दिवाण खवटी स्टेशन जवळ ओव्हर हेड वायर तुटल्याची माहिती मिळत आहे. यामुळे कोकण कन्या एक्सप्रेस ही गेल्या ५ तासांपासून वीर रेल्वे स्थानकात उभी करण्यात आली आहे. या ट्रेनला डिझेल इंजिन लावून गाडी पुढे नेण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. (Konkan Kanya Express Latest News)

Konkan Railway News
Maharashtra Vs Karnataka: टाचणीभरही जमीन कर्नाटकात जाणार नाही; मुख्यमंत्री बोम्मईंना भाजपचा घरचा आहेर

मिळालेल्या माहितीनुसार दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ही घटना घडली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने अनेक गाड्या रेल्वे स्टेशनवर उभ्या करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे (Kokan Railway) मार्गावरील अनेक गाड्या (Trains) दोन ते साडेतीन तास उशिराने धावत आहेत. यात कोकण कन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस, मडगांव एक्स्प्रेस अशा अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळेंनाही फटका

दरम्यान याचा फटका भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनाही बसला आहे. चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील कोकण कन्या एक्सप्रेसने प्रवास करत आहेत. बावनकुळे हे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर असून आज ते रत्नागिरी जिल्ह्यात असणार आहेत. मात्र कोकण रेल्वे वाहतुकीच्या खोळंब्यामुळे त्यांनाही याचा फटका बसला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com