कोपरगावचे नगराध्यक्ष म्हणतात, आमचा विकास चोरीला गेला

कोपरगावचे नगराध्यक्ष म्हणतात, आमचा विकास चोरीला गेला
विजय वहाडणे, नगराध्यक्ष, कोपरगाव.साम टीव्ही

अहमदनगर ः शहरतील विविध उद्याने, सार्वजनिक शौचालयातील साहित्यांची काही गुंड अप प्रवृत्तीचे लोक चोरी करतात. शहरातील विकास एक तर चोरीस जातो नाही तर त्याची तोडफोड केली जाते.अशा गुंडवप्रवृत्तीचा सर्व सामान्यांना त्रास होत आहे. जनतेच्या लाखो रुपयांची नासधूस होत असल्याची खंत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केली.

पत्रकात त्यांनी म्हटले की, शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, जिजामाता उद्यानातील काही सिमेंटची बाके, काही खेळण्या, काही संरक्षक भिंती-जाळ्या काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी तोडल्या आहेत.

विजय वहाडणे, नगराध्यक्ष, कोपरगाव.
डॉक्टर तरूणीचा गर्भपात, विवाहित पोलिसाने केला प्रेमाचा घात

कररूपाने जमा झालेल्या नागरिकांच्या पैशातून लाखो रूपये खर्च करून विकास करण्याचा प्रयत्न सुरू असतो, पण काहीजण अशा प्रकारे शहराचेच नुकसान करत आहेत. गांधीनगर येथे नव्याने बांधलेल्या शौचालयातही पायऱ्या-वायरिंग तोडून टाकले आहेत. काही ठिकाणी शौचालयाचे दरवाजेही चोरीला गेले. अनेकदा शौचालयातील बेसिन-भांडेही फोडले जातात. स्वा.सावरकर चौकात लाखो रूपये खर्च करून बांधलेल्या स्वच्छतागृहातही असेच नुकसान केले जात आहे. शहरात अजून स्वच्छता गृहांची आवश्यकता आहे,पण कुणाच्या भरवशावर काम करायचे. अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्याही आढळतात, त्यामुळे गटारी तुंबतात.

शहरात अनेक ठिकाणी "ओपन जीम" उभारता येतील, सुशोभीकरणही करता येईल पण शहरातील काही गुंड-व्यसनी अपप्रवृत्तीमुळे तेही करता येत नाही. कारण नगरपरिषदेला विकास कामांसाठी निधीची कमतरता असतांना असे होणारे नुकसान-तोडफोड योग्य नाही. अशाच प्रकारे तोडफोड-नुकसान होणार असेल तर सार्वजनिक शौचालये कायमस्वरूपी बंद करायची वेळ येऊ शकते.

याची गंभीर नोंद शहरवासीयांनी व सर्वपक्षीय कार्यकर्ते, समाजसेवकांनी घेतली तर शहराचे हितच होईल. शहराचे असे नुकसान-तोडफोड करणाऱ्यांना राजकीय पदाधिकाऱ्यांनी वठणीवर आणले बरे होईल, असे मत वहाडणे यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com