Kopargaon News: टँकरमधून गॅसचा काळबाजार; आयजींच्या कारवाईत २८ लाखांचा मुद्देमाल जप्‍त

टँकरमधून गॅसचा काळबाजार; आयजींच्या कारवाईत २८ लाखांचा मुद्देमाल जप्‍त
Kopargaon News
Kopargaon NewsSaam tv

सचिन बनसोडे

कोपरगाव (अहमदनगर) : गॅस टँकरमधून कमी दरात गैरकायदेशीरपणे व्यावसायिक सिलेंडर भरून ते चढ्या दराने विकणाऱ्या टोळीला विशेष (Police) पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. हा गॅसचा काळा बाजार अनेक दिवसांपासून सुरू असल्‍याचे बोलले जात आहे. (Maharashtra News)

Kopargaon News
Traffic Rules: वाहतुक नियमांचे उल्लंघनाच्‍या वर्षभरात चार लाख कारवाया; ई-चलानचे २१ कोटी थकबाकी

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कोपरगाव येथे जेऊर कुंभारी शिवारात एका ढाब्याच्या समोर ही कारवाई करण्यात आली आहे. कोपरगावात (Kopargaon News) गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्‍याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्‍या आधारावर काळा बाजार करणाऱ्यांवर आयजींच्या पथकाने धाड टाकली. यावेळी गॅस वाहतुक करणारे टँकरमधून सिलेंडरमध्ये नळी जोडुन गॅस भरतांना दोन इसम आढळून आले.

२८ लाखाचा मुद्देमाल जप्‍त

पोलिसांनी केलेल्‍या या कारवाईत २८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात ४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र कोपरगाव हद्दीत इतक्या मोठ्या प्रमाणात गॅसचा काळाबाजार सुरू असल्याने स्थानीक पोलीस प्रशासन आणि पुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com