विधानपरिषद निवडणूक : आमदार गेले अमेरिकेला; बविआचे एक मत कमी पडण्याची शक्यता, फटका कुणाला ?

बहुजन विकास आघाडीच्या पक्षाच्या तीन आमदारांची मते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वसईच्या वाऱ्या घातल्या होत्या.
Maharashtra MLC Election
Maharashtra MLC Election Saam Tv

चेतन इंगळे

विरार : नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजन विकास आघाडीला चांगलाच भाव मिळाला होता. या पक्षाच्या तीन आमदारांची मते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांनी वसईच्या वाऱ्या घातल्या होत्या. आता विधान परिषदेची (MLC) निवडणूक जाहीर झाल्याने पुन्हा आमदारांचे वजन वाढले आहे. त्यात आता बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा विधानसभेचे आमदार क्षितीज ठाकूर विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर परदेश वारीवर गेल्याने विधानपरिषेदेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे एक मत कमी पडणायची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पुन्हा नाटकीय राजकीय घडामोडींना ऊत येणार आहे. (Maharashtra Politics News In Marathi )

नुकत्याच विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्याने नुकतेच कॉंग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. यामुळे पुन्हा एकदा बड्या नेत्यांच्या वाऱ्या सुरु होणार आहेत. बहुजन विकास आघाडीकडे ३ आमदार असल्याने त्यांच्या मतांसाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी अनेक बडे राजकीय नेते वसईत येणार आहेत.

पण आमदार क्षितीज ठाकूर हे कौटुंबिक कारणासाठी न्यूयॉर्क येथे गेले आहेत आणि कधी परत येणार याची कोणतीही माहिती पक्षाकडून देण्यात आली नाही. यामुळे या विधानपरिषेदत त्यांचे मतदान कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा फटका निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना बसणार असल्याने आमदार क्षितीज ठाकूर यांना लवकर मायदेशी परत आणण्यासाठी वसईत पुन्हा राजकीय वातावरण रंगणार असल्याची चर्चा केली जात आहे.

विधान परिषद निवडणूक २० जून रोजी होणार

राज्यसभेच्या निवडणुकीबरोबर विधानपरिषदेची निवडणूकही (MLC Election) चुरशीची होणार आहे. राज्यसभेत 6 व्या जागेसाठी भाजप विरोधात शिवसेना अशी रंगत पाहायला मिळाली.मात्र आता विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप (BJP) विरोधात काँग्रेस (Congress) अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे २० जून रोजी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com