Manoj Jarange Andolan : मनोज जरांगे पाटील यांना अटक करा, कुणबी सेनेची मोठी मागणी

Kunbi Sena Demand : कुणबी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे.
Vishwanath Patil
Vishwanath PatilSaam TV

Maratha Arakshan Andolan :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण १३व्या दिवशीही सुरुच आहे. जरांगे पाटलांनी आजपासून पाणी आणि औषध त्यागण्याचा इशारा दिला होता. मात्र मनोज जरांगे पाटलांचं सुरु असलेलं आंदोलन बेकायदेशीर असून त्यांना अटक करण्याची मागणी कुणबी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.

विश्वनाथ पाटील यांनी पत्रात म्हटलं की, मराठा महासंघाच्या वतीने राज्यात हिंसक आंदोलन सुरु आहे. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आंदोलन सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या चौकटीत बसत नाही म्हणून रद्द केलं आहे. (Latest News Update)

Vishwanath Patil
Kunbi-OBC Protest News : '...तर महाराष्ट्र पेटवू', कुणबी-ओबीसी समाजाचा आजपासून एल्गार

मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुणबी समाजाचा विरोध नाही; ही भूमिका आम्ही वेळोवेळी स्पष्ट केली आहे. मात्र मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसीमध्ये असलेल्या ३७० च्यावर जातींवर हा अन्याय असेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील सरकारवर दबाव टाकून राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करत आहेत. त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी. त्यांना उपोषणावरुन उठवावे. त्यांच्या सनदशीर आणि लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला आमचा विरोध नाही.

मात्र त्यांच्याजवळ कोणताही दस्तावेज नसताना वंशावळीची अट रद्द करण्याची त्यांची मागणी भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करणारी आहे, असंरी विश्वनाथ पाटील यांनी म्हटलं.  (Political News)

Vishwanath Patil
Ajit Pawar in Pune : आम्हाला अजितदादाच पालकमंत्री हवेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी

मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने समिती नेमलेली असताना घाईने जीआर काढणे ही ओबीसी आणि कुणबी समाजावर अन्याय करणारी कृती आहे. शासन मनोज जरांगे यांचं उपोषण सदनशीर मार्गाने उठवण्याचा प्रयत्न करत असताना जरांगे आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत.

पोलीस कारवाई करुन महाराष्ट्रात निर्माण झालेला तणाव दूर करण्याची आम्ही विनंती करत असल्याचंही कुणबी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी म्हटलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com