चोरट्यांनी पळवले दोन बोकड; घटना सीसीटीव्हीत कैद...

लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चोरट्यांनी पळवले दोन बोकड; घटना सीसीटीव्हीत कैद...
चोरट्यांनी पळवले दोन बोकड; घटना सीसीटीव्हीत कैद...Saam Tv

भंडारा - जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातिल सरांडी (बु) येथे शेतात असलेल्या गोठयातुन चोरट्यांने 2 बोकड चोरुन नेल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे. बोकड चोरतांना आरोपी सीसीटीव्हीत CCTV मध्ये कैद झाले आहे. सरांडीचे प्रगतशील शेतकरी तुलाराम विठोले यांच्या मालकीचे हे बोकड आहे. याबाबत लाखांदूर Lakhandur पोलीस ठाण्यात Police Station गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

लाखांदूर वरुण 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या सरांडी गावात प्रगतशील शेतकरी तुलाराम विठोले यांचे शेत असून शासनाच्या योजनेतून शेतात गोठा बांधत त्यांनी कृषि विभागाच्या सहाय्याने 9 शेळ्या व 8 बोकड घेतले. घटनेच्या दिवशी शेळ्या संध्याकाळी गोठयात बांधल्या होत्या.

चोरट्यांनी पळवले दोन बोकड; घटना सीसीटीव्हीत कैद...
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष, कार्याध्यक्षासह 11 जणांवर गुन्हा

दरम्यान रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास 2 चोरट्यांनी गोठयात मागच्या बाजूने प्रवेश करत 20 हजार रुपये किंमतीचे 2 बोकड चोरुन नेले. सकाळी गोठयात गेल्यावर 2 बोकड कमी असल्याची माहिती शेतकरी तुलाराम विठोले यांना समजली. त्यांनी सीसीटीव्हीत तपासले असता हा सर्व प्रकार उघडिस आला आहे. या घटनेबाबद लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेत आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com