दुप्पट नफ्याचे आमिष दाखवत लाखोंचा गंडा; वर्षभर पोलिसांना चकवा, अखेर गजाआड
Dombivali News Saam TV

दुप्पट नफ्याचे आमिष दाखवत लाखोंचा गंडा; वर्षभर पोलिसांना चकवा, अखेर गजाआड

वारंवार नंबर आणि ठिकाणं बदलत वर्षभर पोलिसांना चकवा देत होता.

डोंबिवली: व्हाट्सअँपच्या माध्यमातून संपर्क करत दुप्पट नफ्याचे आमिष दाखवत एका इसमाला तब्बल चार साडे लाखांचा गंडा घालत पसार होणाऱ्या भामट्याला डोंबिवली (Dombivali Police) विष्णू नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अनिल पेदुरी अस या आरोपीचे नाव असून गुन्हा दाखल होताच हा भामटा गुजरातला पळून गेला होता. वारंवार नंबर आणि ठिकाणं बदलत वर्षभर पोलिसांना चकवा देत होता.

अखेर पोलिसांनी तांत्रिक दृष्ट्या तपास करत या भामट्याला सूरत येथे सापळा रचून अटक केली. त्याने अजून किती जणांची फसवणूक केली आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. डोंबिवली येथे राहणाऱ्या फिर्यादीला अज्ञात व्यक्तीने व्हाट्सअँपद्वारे संपर्क साधून ओळख वाढवली. एका कंपनीत पैशांची गुंतवणूक करण्यास सांगत या भामट्याने त्यांना दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवलं होतं. या आमिषाला बळी पडत सदर फिर्यादीने त्याला सांगण्यात आलेला खात्यावर साडेचार लाख रुपये जमा केले.

गुंतवणूक केल्यानंतर वर्षभराचा कालावधी उलटला मात्र पैसे परत न मिळाल्याने फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आलं आणि त्यांनी याप्रकरणी डोंबिवली पश्चिम कडील विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपी अनिल पेदुरी पसार झाला आणि गेल्या वर्षभरापासून आपले मोबाईल, ठिकाण बदलत तो पोलिसांना चकवा देत होता.

मात्र विष्णुनगर पोलिसांचे एक पथक त्याच्या मागावर होते. अखेर तांत्रिक पद्धतीने तपासादरम्यान त्यांना अनिल ठाव ठिकाणी मिळाला. तो गुजरात सुरत येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक सुरत येथे जाऊन सापळा रचत आरोपीला बेड्या ठोकल्या. अनिलने आणखी किती जणांचे अशा प्रकारे फसवणूक केली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.