नागपुरात घरासाठी भूखंड घेणं झालं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर!

नागपूरात विकास शुल्कात तिप्पट वाढ!
नागपुरात घरासाठी भूखंड घेणं झालं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर!
नागपूरात घरासाठी भूखंड घेणं झालं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर! Saam Tv

संजय डाफ

नागपूर : नागपूरात घर बांधण्यासाठी भूखंड घेणं आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. नागपूर सुधार प्रन्यासनं विकास शुल्कात तब्बल तिप्पट वाढ केली आहे. नागरिकांना आता 56 रुपये प्रति फुट ऐवजी 168 रुपये फूट शुल्क मोजावे लागणार आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना नागपूरात भूखंड घेऊन घर बांधणं एक दिवास्वप्नचं झालं आहे.

नागपूर शहरातील अनियमित भूखंड नियमित करण्यासाठी गुंठेवारी कायदा करण्यात आला आहे. यासाठी 56 रुपये प्रति चौरस फूट विकास शुल्क आकारले जात होते. मात्र, यात वाढ करून 168 रुपये चौरस फूट करण्यात आलं आहे. त्यामुळं नागरिकांना भूखंड नियमित करताना दोन ते तीन लाख रुपये अधिकचा भुर्दंड बसणार आहे. या निर्णयाचा भाजपनं विरोध केलाय. या विरोधात रस्त्यावर उतरून विरोध करू, तसंच अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचा इशारा भाजपनं दिला आहे.

तिकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसनं ही या निर्णयाचा विरोध केला. यासंदर्भात त्यांनी नगरविकास मंत्र्यांना पत्रही लिहलं असून कुठल्याही परिस्थिती मध्ये आम्ही शुल्का वाढ होऊ देणार नाही, अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे.

नागपूरात घरासाठी भूखंड घेणं झालं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर!
Anil Deshmukh : अनिल देशमुख यांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

विकास शुल्काच्या मोबदल्यात सुधार प्रन्यासला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत असते. मात्र, वास्तविक अनेक भागात विकास शुल्क घेऊ सुविधांचा अभाव असल्याचं चित्र आहे. त्यामुळं आधीच महागाईच्या आगीत होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेला सरकारनं दिलासा देण्याऐवजी दरवाढीचे चटके देण्याचं काम केलंय.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com