कसारा घाटात दरड कोसळली; इगतपुरीला जाणारी रेल्वे वाहतूक बंद

कसारा घाटात दरड कोसळली; इगतपुरीला जाणारी रेल्वे वाहतूक बंद
landslide on rail track kasara ghat

- फैय्याज शेख

शहापूर : शहापूर तालुक्यात आजही (साेमवार) पावसाची संततधार सुरूच आहे. मध्य रेल्वेच्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ पोल क्रमांक 122/38 येथे दरड कोसळली आहे. परिणामी कसारावरून इगतपुरीकडे जाणारी लांब पल्याच्या एक्सप्रेस (रेल्वे) सेवा वाहतूक बंद झाली आहे. (landslide-on-rail-track-kasara-ghat-rain-updates-sml80)

लांब पल्ल्याच्या गाड्या कसारा स्थानकात थांबविण्यात आल्या आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे.

कसारा घाटात रेल्वेच्या रुळांवर दरड कोसळली आहे. landslide on rail track kasara ghat कसा-याहून - इगतपुरीला जाताना रेल्वे रुळांवर दरड कोसळली असून रेल्वे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापनचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

landslide on rail track kasara ghat
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष, कार्याध्यक्षासह 11 जणांवर गुन्हा

रेल्वे लाईनच्या एका ट्रॅकवर मातीचा मोठा ढिगारा खाली आला आहे. रविवारी रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता. कसारा घाटात मुंबई नाशिक महामार्गा असो कि कसारा घाटातील रेल्वे मार्ग ठिक ठिकाणी डोंगर डोंगरावरून माती व दगड धसून खाली पडत आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com