नदीपात्रात टाकला बेकायदा भराव, शेतात घुसले पाणी

नदीपात्रात टाकला बेकायदा भराव, शेतात घुसले पाणी
तहसीलदार अर्चना भाकड यांना निवेदन देताना शेतकरी.SYSTEM

अहमदनगर : बंधारा बांधायचा झाल्यास नदीचा प्रवाह, त्यामुळे बाधित होणाऱ्या क्षेत्राची माहिती असा सर्व सर्व्हे केला जातो. परंतु काशी नदीपात्रात शेतकऱ्याने स्वतःच्या फायद्यासाठी आगळीक केली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले.

काशी नदीपात्रात बेकायदा भराव टाकल्याने नदीचा प्रवाह बदलून तिचे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरले. यात परिसरातील सुमारे 200 एकरांवरील ऊस, केळी, कापूस, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करावेत, तसेच संबंधित भराव काढून टाकण्यात यावा, अशी मागणी मुंगी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार अर्चना पागिरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. Large losses to farmers due to river blockage abn79

तहसीलदार अर्चना भाकड यांना निवेदन देताना शेतकरी.
डॉक्टर तरूणीचा गर्भपात, विवाहित पोलिसाने केला प्रेमाचा घात

निवेदनात म्हटले आहे, की मुंगी शिवारातील आठ नंबर चारी परिसरातील भागात काहींनी काशी नदीचा नैसर्गिक प्रवाह दगडी बांध घालून अडवला आहे. परिसरातील नागरिक त्याचा ये-जा करण्यासाठी वापर करतात. 30 व 31 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले. त्यावेळी नदीचा प्रवाह बदलून पाणी परीसरातील शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

सध्या शेतामध्ये चार ते पाच फुटांपेक्षा जास्त पाणी साचले आहे. सलग दोन वर्षांपासून हा प्रकार होत असल्याची तक्रार मुंगी शिवारातील बाधित शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. शेतामध्ये पाणी शिरल्याने मुंगी शिवारात दोनशे एकरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी प्रमोद राजेभोसले, अंबादास राशीनकर, बाळासाहेब ठुबे, रामेश्वर ठुबे, मधुकर ठुबे, दत्तात्रय ठुबे, एकनाथ ठुबे, संतोष ठुबे, अन्सार तांबोळी, मोहन देवढे, आबासाहेब कांबळे, एकनाथ लेंडाळ, शिवाजी देवढे, बाबासाहेब लेंडाळ, संजय सोनटक्के, राम साळुंके, जगन्नाथ साळुंके, बबन देवढे यांनी समक्ष भेटून माहिती दिली.Large losses to farmers due to river blockage abn79

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com