यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूचे थैमान, रूग्णांना मिळेना बेड

डेंग्यू
डेंग्यूSaam Tv

संजय राठोड

यवतमाळ ः कोरोना महामारीनंतर जिल्ह्यावर नवेच संकट उभे राहिले आहे. डेंग्यू, मलेरिया, टायफाईडने सगळीकडे हाहाकार उडाल्याने उपचारासाठी बेड मिळत नसल्याचे चित्र आहेत. शासकीयसह खाजगी रूग्णालय हाऊसफूल झाल्याचे चित्र आहे. विशेष करून लहान मुलांमुळे आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत.

सध्याचे वातावरण कीटकजन्य आजाराला पोषक आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून किटकजन्य सदृश रुग्णांची संख्या वाढलीय. या रोगराईला आळा घालण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय किटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतोय. हिवताप, डेंगू, चिकुनगुणिया, मेंदूज्वर, चंडिपुरासोबतच यंदा झिकाने डोके वर काढल्याने नागरिकांसह लहान मुले त्रस्त झालीत.Large number of dengue patients in Yavatmal district

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात २ ते १८ या वयोगटातील मुलांमध्ये डेंगू- टायफाईड आणि मलेरिया या आजाराची लक्षणं आढळून येत आहेत. सगळीकडे रूग्णालय हाऊसफूल झाल्याचे चित्र आहे. लहान मुलांना डेंग्यू, टायफाईड आणि मलेरियामुळे तीव्र स्वरूपाचा ताप, अंग दुःखी, डोकेदुखी, अंगावर फुरळ येणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. शासकीय आणि खाजगी रूग्णालयांत प्रचंड गर्दी होत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात १३ तालुक्यात डेंग्यूचे रूग्ण आढळून आले आहेत. शासकीय आकडा १०८ जरी असला तरी खाजगी रुग्णालयात डेंग्यूची मोठ्या संख्येत रूग्ण उपचार घेताय. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाकडे पुरेसी माहिती नसल्याने केवळ १०८ रूग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडे आहेत.

डेंग्यू
पाथर्डीत भाजपसमोर विखे फॅक्टरचेच आव्हान

लहान मुलांवर उपचार करण्यासाठी नागरिक आधी खाजगी रूग्णालयात धाव घेताय. सर्वात आधी रक्त तपासणी करण्याचा सल्ला डाॅक्टराकडून दिला जातो. लहान मुलांचे रक्ताचे नमुने घेण्यासाठी रूग्णालयातील स्टॉपला मोठी कसरत करावी लागते. Large number of dengue patients in Yavatmal district

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात परिसरात दुर्गंधी असते. त्यामुळे मच्छर, डास हमखास त्या परिसरात असतात. डेंगू, मलेरिया आदी आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी घराजवळील परिसर स्वच्छ करा, नाल्या साफ करा, पाणी साठवू नका, कीटकनाशक- फिलिचिंग फवारणी करा. आठवड्यातून एकवेळा घरातील साफसफाई करून कोरडा दिवस पाळ्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी दिलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com