
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा २०२३ मधले सर्वाधिक आश्वासक युवा नेते म्हणून गौरव झाला आहे. या वर्षाच्या यादीत १०० युवा नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. जे राजकीय, नाविन्यपूर्ण उपक्रम, परिवर्तनात्मक संशोधनासारख्या गोष्टींमध्ये सहभागी असलेले, भविष्यवादी विचारसरणी असलेल्यांचा समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये १२० देशांमधल्या तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह ७ भारतीय तरुणांचा समावेश केला आहे. जागतिक स्तरावरील 'वर्ल्ड इकोनॉमिक फोरम'कडून हा सन्मान मिळाला आहे.
पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी कोयता गँगच्या म्होरक्यासह नऊ जणांना अटक केली आहे. सर्वजण मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. पुण्यातील स्वारगेट पोलिसांनी कारवाई केली आहे.
सराईत गुन्हेगार सचिन माने हा घोरपडे पेठेतील त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा रचून पहाटे दोनच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. परंतु त्यावेळी झटापटीत माने याने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात पोलिस कर्मचारी शिवा गायकवाड हे जखमी झाले.
शीतल म्हात्रे पाठलाग प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात दादर पोलिसांनी घेतलं दोघांना ताब्यात घेतले आहे. स्वप्नील माने आणि सागर चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्वप्नील माने हा ठाकरे गटाशी सलग्न असल्याचा पोलिसांना संशय आहे.
महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीची संयुक्त बैठक उद्या दुपारी दोन वाजता मुंबईतील वाय बी चव्हाण येथे होणार आहे. या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, संघटक, महिला संघटक यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षातीला राज्यातील स्थानिक नेत्यांना या बैठकीला बोलावण्यात आलेलं आहे. स्वतः या बैठकीत उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.
महाविकास आघाडीची संयुक्त बैठक वाय बी चव्हाण येथे झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा या निवासस्थानी होणार आहे.उद्धव ठाकरे यावेळी देखील उपस्थित असतील.
पुण्यातील धायरी परिसरात भीषण आग, सिलिंडर स्फोट झाल्याचीही माहिती
राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर मुख्यमंत्र्यांनी निवदेन दिले आहे. 'जुन्या पेन्शनबाबत समिती नेमली आहे. ३ महिन्यात ही समिती अहवाल सादर करणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात सांगितले.
शीतल म्हात्रे पाठलाग प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. शीतल म्हात्रेंचा करणाऱ्या २ अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दोन अनोळखी दुचाकीस्वाराच्या विरोघात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर भा. दं. वि ३५४ (ड), ३५२ आणि ३४ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीपचा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा म्हात्रे यांच्या जबाबात उल्लेख आहे. दादर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवायांवरून विरोधी पक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न विचारले.
देशात तपास यंत्रणांकडून त्रास सुरू झाला आहे, तपास होण्यापूर्वीच भाजप नेत्यांकडे कागदपत्रे पोहोचतात, असं त्या म्हणाल्या.
यशवंत जाधव, यामिनी जाधव यांच्यावर आरोप झाले. सोमय्यांनी आरोप केले होते. त्यानंतर ईडीचा ससेमिरा मागे लागला होता. आता आरोप कुठे आहे?
प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप झाले, त्यापुढे काहीच झाले नाही. भावना गवळी, अर्जुन खोतकर यांच्याबाबतही तेच झालं, भाजप वॉशिंग मशीनप्रमाणे काम करत आहे का, असा सवाल चतुर्वेदी यांनी केला.
अखेर विधान परिषद हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची नियुक्ती
आज सकाळी 11 वाजता उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीमध्ये निर्णय
काँग्रेसकडून भाई जगताप, तर भाजपकडून प्रसाद लाड अध्यक्षपदासाठी आग्रही होते
संख्याबळानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे उपसभापती यांचा निर्णय
महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे सांगलीत आयोजन
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या पुण्यातील बैठकीनंतर महिला कुस्तीसाठी मोठा निर्णय
२३ आणि २४ तारखेला सांगलीत पार पडणार महिला केसरी कुस्ती स्पर्धा
सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने महिला केसरीचे आयोजन
महिला केसरी कुस्ती स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राहणार उपस्थित
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेव मोहिते यांची माहिती
व्हिडिओ व्हायरल प्रकरणात बोरिवली पोलिसांनी आज आरोपी साईनाथ दुर्गे व अक्षय धनदर याला न्यायालयात हजर केले असता बोरिवली न्यायालयाने आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दहिसर पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीची १४ दिवसांची कोठडी मागितली, मात्र न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळत आरोपी साईनाथ दुर्गे व अक्षय या दोघांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. उद्या पुन्हा दोघांना बोरवली न्यायालयात हजर केले जाणार आहे.
२०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ५०६१ शेतकरी आत्महत्या
२०१९ ते २०२१ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना १६६० शेतकरी आत्महत्या
तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जुलै २२ ते जानेवारी २०२३ या ७ महिन्यांत १०२३ शेतकरी आत्महत्या
जयंत पाटील यांनी सादर केली आकडेवारी
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या अडचणी वाढणार
विधीमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण करणे भोवणार
विधीमंडळाकडून कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार, सूत्रांची माहिती
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ ED कार्यालयात दाखल, मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाने दिला अटकेपासून दिलासा
खतांच्या आणि बियाणांच्या किमती नियंत्रणात आणल्या पाहिजेत, अजित पवारांची मागणी, उत्पन्न कमी आणि खर्च जास्त त्यामुळे शेतकरी आत्महत्या करु शकतात
शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंब मालमत्ता चौकशी प्रकरणी आज मुंबई हायकोर्ट देणार निकाल, गौरी भिडे यांनी दाखल केली होती उच्च न्यायालयात याचिका, या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली, कोर्टानं निकाल राखून ठेवला होता, यावर आज निकाल अपेक्षित आहे.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपर्यंत परब यांना अटक करू नका, असे आदेश कोर्टाने ईडीला दिले आहेत. साई रिसॉर्ल्ट प्रकरणी परब यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना तुर्तास मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील दोन आठवडे हसन मुश्रीफ यांना अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला दिले आहेत. हसन मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करावा, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे. थोड्याच वेळात या सुनावणीला सुरूवात होणार असून शिंदे गटाचे वकील युक्तीवाद करणार आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे १६ आमदार पात्र की अपात्र ठरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.
शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. मुंबईवर ५ वर्षानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं लाल वादळ धडकणार आहे. ५ वर्षांपूर्वी ज्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पायी मुंबई गाठली होती. आता पुन्हा त्याच मागण्यांसाठी शेतकऱ्यांवर नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढण्याची वेळ आलीय.
दरम्यान, शेतकरी प्रश्नावर आजही तोडगा निघणार नसल्याची माहिती आहे. कारण, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत राज्य सरकारची आज होणारी बैठक उद्यावर ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंधित खात्याचे मंत्री आणि सचिव यांच्यासोबत शेतकरी शिष्टमंडळाची बैठक होणार होती. मात्र, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्यसरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, मुख्यमंत्र्यांसोबत आज होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर एकीकडे लाँग मार्च मुंबईवर धडकेल तर दुसरीकडे राज्यभर जन आंदोलन पेटेल, असा इशारा किसान सभेने दिला आहे. आता शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील १९ लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. यामध्ये सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील शाळा, कॉलेज, रुग्णालये, सरकारी कार्यालयांना या संपाचा मोठा फटका बसू शकतो. या संपाबाबत राज्य सरकार काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार आहे. एकीकडे सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा सुरू होईल तर दुसरीकडे महाराष्ट्रात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात नवी तारीख काय असणार याचे उत्तर मिळणार आहे.
शेतकऱ्यांचं लाल वादळ लवकरच मुंबईत धडकणार
तिसरी मोठी बातमी म्हणजे नाशिकवरून मुंबईकडे निघालेलं लाल वादळ मुक्कामानंतर मुंढेगाववरून सकाळी पुन्हा मुंबईकडे निघणार आहे. विविध मागण्यांसाठी माकप, किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.