Kolhapur Crime News: आधी वडिलांची हत्या, मग स्वत: संपवलं जीवन; तरुणानं का उचललं टोकाचं पाऊल?

Son Kills Father: सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
TV Actress Blame Her Co-Actor
TV Actress Blame Her Co-Actorsaam tv

रणजीत माजगावकर

Kolhapuur News: कोल्हापूर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका मुलानेच आपल्या वडिलांचा जीव घेतलाय. शुल्लक वादातून मुलाने बापाची हत्या केली आहे. त्यानंतर त्याने स्वत: देखील गळफास घेत आत्महत्या केली आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.(Latest Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मुलाने वडिलांचा खून करून स्वतः आत्महत्या केली आहे. काल (सोमवार) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मुलगा आणि वडील दोघेही चंदगडच्या देसाई वसाहतीमध्ये राहत होते.

TV Actress Blame Her Co-Actor
Pune Crime News: पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

सागर गावडे असे मृत मुलाचे नाव आहे. तर मनोहर गावडे असे मृत वडिलांचे नाव आहे. घटना घडली त्या दिवशी दोघेही शेजारी राहणाऱ्या एका नातेवाईकाच्या घरी गेले होते. तेथे त्यांनी रात्रीचे जेवण केले. त्यानंतर ते आपल्या घरी परतले. घरी आल्यावर या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन ही दुर्दैवी घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या व्यक्तींशी विचारपूस करण्यात आली तेव्हा समजले की, सागर आणि मनोहर दोघेही बाप (Father) लेकांना दारू पिण्याचे व्यसन होते. या व्यसनामुळेच त्यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी देखील दोघांनी खूप दारू पिली होती. त्यानंतर त्यांच्यात भांडणे झाली. यावेळी घरी कोणीही नव्हते. त्यामुळे त्यांची भांडणे पटकन सोडवता आली नाही. घरी कोणी नाही हे पाहून सागरने वडिलांची हत्या केली. त्यानंतर आपण केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाल्याने त्याने स्वत:ला गळफास लावून जीवन संपवलं.

TV Actress Blame Her Co-Actor
Beed Crime: पतीसोबत वाद करुन माहेरी निघाली, पण नराधमाने रस्त्यातच गाठले; संतापजनक घटनेने बीडमध्ये खळबळ

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com