धक्कादायक : कोविडच्या Online प्रमाणपत्रासाठी आशा वर्करला मारहाण

कोविडच्या ऑनलाइन प्रमाणपत्रासाठी आशा वर्करला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
धक्कादायक : कोविडच्या Online प्रमाणपत्रासाठी आशा वर्करला मारहाण
धक्कादायक : कोविडच्या Online प्रमाणपत्रासाठी आशा वर्करला मारहाण

संजय राठोड -

यवतमाळ : कोविडच्या ऑनलाइन प्रमाणपत्रासाठी आशा वर्करला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना काळात आपल्या जीवावरती उदार होतो घरोघरी जाऊन राज्य शासनाच्या सुचनांचे पालन करुन आपली कोरोना (Corona) चाचणीची माहिती असो वा आपल्या घरांचा अशा आपत्तीच्या काळातही सर्व्हे करने असो अशी काम करणाऱ्याच आशा वर्करला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

धक्कादायक : कोविडच्या Online प्रमाणपत्रासाठी आशा वर्करला मारहाण
Mumbai : जनतेच्या सेवेसाठी काम करतांना महापालिका लपवाछपवी करत नाही - मुख्यमंत्री

नांझा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या आशा वर्करला कोविडच्या ऑनलाइन प्रमाणपत्रासाठी (Covid Certificate) मारहण केल्याची घटना कळंब तालुक्यातील गणेशवाडी येथे घडली आहे. विना ससाणे असे जखमी आशा वर्करचे नाव असून त्या नांझा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (Primary Health Center) येणाऱ्या गणेशवाडी येथील एका व्यक्तीने त्यांना घरी येऊन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या संदर्भात कळंब पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. अशा घटनांना आळा घालण्यासाठी गंभीर दखल घ्यावी यासाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन लक्ष वेधले. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.